आता मूडच नाही तर चेहरा करा फ्रेश, घरातच बनवा कॉफीचे 5 फेसपॅक
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
कॉफी सहसा आपला मूड फ्रेश करण्यासाठी घेतली जाते. पण चेहरा फ्रेश करण्यासाठी कॉफी ट्राय केलीत का?
अनेकांची सकाळ गरमागरम चहासोबत होत असली तरी कॉफीचे चाहतेही कमी नाहीत. कामाचा कंटाळा आला की मूड फ्रेश होण्यासाठी अनेकांची पसंती कॉफीला असते. पण हीच कॉफी चेहऱ्याला लावून तुम्ही तजेलदारपणा मिळवू शकता. शक्ती देवतीची पूजा करण्यात येणारा नवरात्री उत्सव आता सुरू होतोय. सणाच्या दिवशी प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा असं वाटतं. तर तुम्ही कॉफीचे हे 5 फेसपॅक ट्राय करू शकता. याबाबत ब्युटीशियन प्रीती खडसे यांनी माहिती दिलीय.
advertisement
advertisement
advertisement
एक चमचा कॉफी, एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबूचा रस एकत्र करून त्वचेवर स्क्रब करून लावा. कोपर तसेच गुडघे आणि स्किन टॅन झालेल्या ठिकाणी हे लावू शकता. या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की साखर वापरताना ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. जेणेकरून चेहऱ्यावर किंवा त्वचेवर मसाज करत असताना त्यापासून काही नुकसान होणार नाही.
advertisement
advertisement
advertisement








