शरीरातील थंडावा टिकवून ठेवण्यास होईल मदत, औदुंबराचे जल अनेक आजारांवर गुणकारी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
औदुंबराच्या झाडाच्या मुळांनी शोषलेले पाणी हेच औदुंबराचे जल असते. याच पाण्याचे आपले शरीर तंदुरुस्त ठेवणे साठी अनेक उपयोग आहेत.
बऱ्याच जणांनी औदुंबर जलाविषयी ऐकले असेल. परंतु या औदुंबराच्या जलाचा कसा आणि किती फायदा होतो, हे कदाचित खूप कमी लोकांना ठाऊक असेल. इतर झाडांप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मुळे देखील जमिनीखाली पाणी शोषून घेण्याचे काम करतात. मात्र औदुंबराच्या झाडाच्या मुळांनी शोषलेले पाणी हेच औदुंबराचे जल असते. याच पाण्याचे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक उपयोग आहेत. याच बाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरातील</a> आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी सांगितले आहे.
advertisement
खरंतर उंबराच्या झाडालाच औदुंबर असेही म्हणतात. उंबराच्या झाडाचे उंबर आणि काकोडुंबर असे दोन प्रकार आहेत. तर उंबराचे झाड हे नदी काठावर किंवा जास्त पाणी असणाऱ्या ठिकाणी आढळते. उंबराच्या अर्थात औदुंबराच्या पाण्याबरोबरच झाडाची साल, फळ आणि काही प्रमाणात पानांचे देखील औषधी उपयोग आहेत. मात्र औदुंबराचे जल हे अनेक आजारांवर गुणकारी ठरु शकते, असे डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी सांगितले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
याव्यिरिक्त डेंग्यूमध्ये या औदुंबर जलाच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. मूत्रपिंडासंबंधित आणि पोटाच्या अनेक विकारांवर, पचनक्रियाही नियंत्रित ठेवण्यासाठी, निरोगी हृदयासाठी तसेच मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणामांसाठी हे जल उपयोगी ठरते. तर हे औदुंबराचे जल अर्धशिशीवर देखील अतिशय उपयुक्त ठरू शकते. एकूणच हे औदुंबर जल हे गुणधर्माने शित असल्यामुळे याचे सेवन शरीरातील थंडावा टिकवून ठेवण्यास मदत करते, अशी माहिती देखील डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी दिली आहे.


