Health Tips: पोटात संसर्गाचा त्रास होतोय? काय खावं किंवा टाळावं? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
आतड्यांचे कार्य पोषक पदार्थांचे पचन करणे आणि त्यांचे शोषण करून शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवणे हे आहे. मात्र, चुकीच्या खाण्याच्या सवयी, दूषित अन्न किंवा पाण्यामुळे पचनसंस्थेच्या समस्या, विशेषतः पोटाचा संसर्ग होऊ शकतो.
निरोगी शरीरासाठी केवळ योग्य आहार घेणे पुरेसे नाही, तर त्या आहाराचे योग्य पचन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आतड्यांचे कार्य पोषक पदार्थांचे पचन करणे आणि त्यांचे शोषण करून शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवणे हे आहे. मात्र, चुकीच्या खाण्याच्या सवयी, दूषित अन्न किंवा पाण्यामुळे पचनसंस्थेच्या समस्या, विशेषतः पोटाचा संसर्ग होऊ शकतो. याबाबत तज्ज्ञ डॉ. अविनाश शिंदे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पोटाच्या संसर्गाची लक्षणे, कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
advertisement
पोटाच्या संसर्गाची लक्षणे: पोटात संसर्ग झाल्यास उलट्या, जुलाब, पोटात जळजळ, आणि अस्वस्थता यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा लोकांना या संसर्गाची माहिती नसते, त्यामुळे ते चुकीचे पदार्थ खातात, ज्यामुळे आरोग्याला अधिक नुकसान होते. पोटाच्या संसर्गादरम्यान खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य आहार निवडल्यास बरे होण्याचा वेग वाढतो, असं डॉ. शिंदे सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement