Health Tips: हृदयापासून ते त्वचेला फायदेशीर, पावसाळ्यात 5 रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारीचं!

Last Updated:
डोंगराळ भागात, ओलसर शेतमळ्यांत आणि जंगलकडेला आपोआप उगम पावणाऱ्या रानभाज्या बाजारातही झळकू लागतात. यातील अनेक भाज्या केवळ चवदारच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक ठरतात.
1/7
पावसाळा सुरू झाला की निसर्गाची उधळण सुरू होते. डोंगराळ भागात, ओलसर शेतमळ्यांत आणि जंगलकडेला आपोआप उगम पावणाऱ्या रानभाज्या बाजारातही झळकू लागतात. यातील अनेक भाज्या केवळ चवदारच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक ठरतात. ज्या रानभाज्या पावसाळ्यात सहज उपलब्ध होतात आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. अशाच पाच उपयुक्त रानभाज्यांमधील आरोग्यवर्धक गुणधर्माबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.

advertisement
2/7
1. अंबाडी भाजी :- अंबाडी ही रानभाजी चवीला आंबटसर असते. या भाजीची पाने कोवळी असताना ती प्रामुख्याने बनवली जाते. अंबाडीमध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. ही भाजी हृदयाचे आरोग्य सुधारते, उच्च रक्तदाब कमी करते आणि खराब कोलेस्टेरॉलही घटवते. अंबाडीचे फूल पोटाच्या तक्रारींवर औषध म्हणून वापरले जाते. वजन नियंत्रणात ठेवण्यासही अंबाडीची मदत होते, असे डॉक्टर सांगतात.

3/7
2. चवळी भाजी : चवळी किंवा चिवळ ही भाजी नाजूक पानांची असून, ती भरपूर कांदा आणि लाल मिरची घालून स्वादिष्ट बनवली जाते. या भाजीतील औषधी गुणधर्म सांगताना डॉ. आंडे म्हणतात की, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. तसेच, रक्तशुद्धीमध्ये मदत करते. कुठे आतून मार लागल्यास या भाजीचा लेप लावल्याने आराम मिळतो. मूळव्याधीवरही ही भाजी लाभदायक ठरते.

4/7
3. घोळ भाजी : डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, घोळ भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स यांचा समावेश असतो. ही भाजी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी ही भाजी उत्तम आहे. ही भाजी चवीला आंबटसर असून दिसायला चपट्या व मांसल पानांची असते.

5/7
4. तांदुळजा : तांदुळजा, ज्याला कुंजर देखील म्हणतात, ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या भाजीमुळे लघवी साफ होते, रक्तशुद्धी होते, आणि त्वचेशी संबंधित तक्रारी दूर होतात. ही भाजी पचायला हलकी आणि शरीरासाठी गुणकारी आहे, असे डॉक्टर सांगतात.

6/7
5. अळूची पाने: अळू ही भाजी पावसाळ्यात ओलसर ठिकाणी नैसर्गिकरीत्या उगम पावते. तिची पाने मोठी, हिरवी आणि हृदयाकृती असतात. अळूच्या पानांमध्ये खवखव असते, त्यामुळे ती आंबट पदार्थासोबत शिजवली जाते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अळू ही फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असून, योग्य शिजवले असता ही एक पौष्टिक भाजी ठरते.

7/7
जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यांमध्ये या सर्व रानभाज्या सहज उपलब्ध होतात. शुद्ध आणि नैसर्गिक स्वरूपातील या भाज्या केवळ चवीलाच नव्हे, तर आरोग्यवर्धक गुणधर्मांनीही परिपूर्ण आहेत. आजच्या काळात जैविक आणि स्थानिक अन्नपदार्थांचे महत्त्व वाढत असताना, या रानभाज्यांचा आहारात समावेश आरोग्यासाठी अमूल्य ठरतो, असे डॉ. धीरज आंडे यांनी सांगितले.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement