Dhokla Recipe : रविवारी नाश्त्याचं काय? कुकरमध्ये बनवा जाळीदार ढोकळा, सोपी रेसिपी करा ट्राय

Last Updated:
रविवारी सुट्टीच्या दिवशी नाश्त्याला नेमकं काय बनवायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. रोजचे पोहे आणि चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यामुळे रविवारच्या नाश्त्यात काहीतरी खमंग पण हेल्दी असावं असा घरच्यांचा हट्ट असतो. तेव्हा ढोकळा हा रविवारच्या नाश्त्यासाठी अगदी सोपा आणि चवदार पर्याय आहे. तेव्हा घरच्या घरी जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
1/6
ढोकळा खायला सर्वांनाच आवडतो पण अनेकांची तक्रार असते की घरी ढोकळा बनवताना तो हॉटेल सारखा जाळीदार आणि टेस्टी बनत नाही. तेव्हा निवडक साहित्यांचा वापर करून जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी पाहुयात.

advertisement
2/6
जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी लागणार साहित्य : बेसन, हळद, तेल, मीठ , साखर, हिरवी मिरची, आलं, लिंबाचा रस, पाणी, इनो, जिरं, मोहरी कडीपत्ता.

3/6
मिक्सरच्या भांड्यात दोन कप बेसन पीठ घेऊन त्यात एक चमचा हळद, एक चमचा तेल, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा आलं, एक कप पाणी, दोन चमचे लिंबाचा रस, इत्यादी घालून मिक्स करा.

4/6
मिक्सरच्या भांड्यात फिरवलेलं बॅटर कुकरच्या भांड्यात काढून घ्या पण त्यापूर्वी भांड्याला तेलाने कोट करून घ्या. कुकरमध्ये पाणी टाकून थोडावेळ गरम होऊ द्यात आणि मग ते कुकरचं भांड कुकरमध्ये ठेवा.

5/6
कुकरचं झाकण लावण्यापूर्वी त्याची शिट्टी काढा आणि 15 मिनिटांसाठी ढोकळा मध्यम आचेवर वाफवून घ्या. 15 मिनिटांनी ढोकळा शिजला की नाही हे टूथपिक घालून चेक करा.

6/6
ढोकळा तयार झाल्यावर तो कुकरच्या भांड्यातून नीट काढून घ्या मग त्याचे स्लाइस करा. मग त्यावर फोडणी घालण्यासाठी एका चमच्यात तेल गरम करून घ्या आणि तेल गरम झाल्यावर एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिरवी मिरची, साखर आणि थोडं पाणी घालून तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून पसरावा. अशा प्रकारे तुमचा मऊ आणि जाळीदार ढोकळा तयार होतो. हा ढोकळा तुम्ही पुदिना चटणी सोबत खाऊ शकता.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement