Milk : तुम्ही दूध उकळून पिताय? पॅकेटबंद दुधासंबंधीत 'ही' चूक पडेल महागात, अनेकांना माहितच नाही हा नियम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण वैज्ञानिक आणि डेअरी तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वेळी दूध उकळण्याची गरज नसते. उलट, पॅकेटमधील दूध जास्त उकळल्याने तुम्ही त्यातील पोषक तत्व स्वतःच नष्ट करत आहात. नक्की काय आहे यामागचं शास्त्र? चला समजून घेऊया.
आपल्याकडे सकाळची सुरुवात वाफाळलेल्या चहाने किंवा गरम दुधाच्या पेल्याने होते. दूध घरी आलं की, ते पातेल्यात ओतून गॅसवर ठेवणं आणि त्याला किमान 2-3 उकळ्या येईपर्यंत उकळणं, हे आपल्याकडच्या प्रत्येक गृहिणी करतेच. दूध चांगलं उकळलं की त्यातले जंतू मरतात, हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला विश्वास आहे. पण, आजच्या आधुनिक काळात जेव्हा आपण पॅकेटबंद दूध वापरतो, तेव्हा ही पद्धत फायद्याची ठरते की तोट्याची?
advertisement
advertisement
1. पॅकेटमधील दूध उकळण्याची गरज का नाही?बाजारात मिळणारं पॅकेटबंद दूध हे आधीच 'पाश्चुरीकरण' (Pasteurization) प्रक्रियेतून गेलेलं असतं. या प्रक्रियेत दूध एका विशिष्ट उच्च तापमानावर गरम करून लगेच थंड केलं जातं, ज्यामुळे त्यातील ई.कोलाई आणि साल्मोनेलासारखे 99.9% हानिकारक बॅक्टेरिया आधीच नष्ट झालेले असतात.
advertisement
advertisement
advertisement
दूध जास्त उकळल्याने होणारे नुकसानजेव्हा आपण आधीच शुद्ध केलेलं दूध पुन्हा 100°C वर उकळतो, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम होतात.दुधातील व्हिटॅमिन B1, B2, B6, B12 आणि व्हिटॅमिन C उष्णतेमुळे 10% ते 30% पर्यंत कमी होतात.जास्त उष्णतेमुळे दुधातील प्रथिनांची रचना बदलते, ज्यामुळे आपलं शरीर ती सहजपणे शोषून घेऊ शकत नाही.
advertisement
advertisement
मग दूध गरम कधी करावं?तुम्ही दूध फक्त दोनच स्थितीत हलकं गरम 70-80°C पर्यंत करू शकता. ते पण जर तुम्हाला कोमट किंवा गरम दूध पिण्याची आवड असेल. जर दूध पॅकेटमधून बाहेर काढून बराच वेळ बाहेर (ओट्यावर) ठेवलं असेल. अशा परिस्थीत देखील तुम्ही ते थोडं गरम करुन ठेवू शकता.टीप: एकदा पॅकेट उघडलं की ते २-३ दिवसांत संपवा आणि नेहमी फ्रीजमध्येच ठेवा.
advertisement
4. पण 'सुटं दूध' उकळणं अनिवार्य आहेगवळी किंवा डेअरीवरून येणारं सुटं (कच्चं) दूध उकळणं मात्र अनिवार्य आहे. हे दूध कोणत्याही प्रक्रियेतून गेलेलं नसतं. त्यात प्राणी, भांडी किंवा हातांद्वारे जंतू असण्याची शक्यता असते. असं दूध 100°C वर किमान 10-15 मिनिटे उकळल्याने सर्व घातक विषाणू नष्ट होतात आणि ते पिण्यासाठी सुरक्षित होतं.
advertisement
advertisement






