Longest Night 2023 : 'या' तारखेला आहे वर्षातील सर्वात मोठी रात्र; पाहा काय आहे या दिवसाचे महत्त्व..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
सूर्याची किरणे मकर राशीसह थेट विषुववृत्ताच्या दक्षिणेला पोहोचतात तेव्हा वर्षातील सर्वात मोठी रात्र असते. या दिवसापासून उत्तर गोलार्धात हिवाळ्याची सुरुवात होते. ही एक खगोलिय घटना आहे. चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
16 तासांची असेल रात्र : सॉल्स्टिस हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे आणि याचा अर्थ सूर्य सध्या स्थिर आहे असा होतो. कारण संक्रांतीच्या वेळी सूर्य उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिशा बदलण्यापूर्वी काही काळ स्थिर असतो. 22 डिसेंबरला हिवाळी संक्रांती देखील म्हणतात. शास्त्रानुसार या दिवसाला दक्षिणायन असेही म्हणतात. हिवाळ्यातील संक्रांतीची रात्र सुमारे 16 तासांची असते. यंदा 22 डिसेंबरला ही रात्र आहे आणि ही रात्र देखील सुमारे 16 तासांची असेल.
advertisement
असा साजरा केला जातो हा दिवस : 22 डिसेंबर हा दिवस इराण, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये विंटर सॉल्स्टिसला याल्दा किंवा शब-ए-याल्दा म्हणून साजरा केला जातो, तर ज्यू लोक तेकुफत टेव्हेट म्हणून विंटर सॉल्स्टिस साजरा करतात. याकडे हिवाळ्याची सुरुवात म्हणून पाहिले जाते. चीनमध्ये या दिवशी मेजवानी आयोजित केली जाते आणि अनेक कुटुंबे एकत्र येऊन जेवतात.