Weight Loss : मनसोप्त आंबे खाऊनही वजन कमी करता येईल, फक्त फॉलो करा या टिप्स
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सध्या आंब्यांचा सीझन सुरु झालेला असून बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी आलेले आहेत. वर्षातून फक्त काही महिने मिळणारे हे रसाळ फळ खाण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. परंतु काहीवेळा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना आंब्यांचे सेवन करणे टाळावे लागते. आंबा खाल्ल्याने वजन वाढते असा काहींचा समज आहे. पण हे अर्धसत्य असून योग्य प्रमाणात आणि पद्धतीने आंबा खाल्ल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते.
आंब्यामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. एक कप कापलेल्या आंब्यामध्ये 99 कॅलरीज, 1.4 ग्रॅम प्रथिने, 25 ग्रॅम कार्ब, 22.5 ग्रॅम साखर, 2.6 ग्रॅम फायबर, 67% व्हिटॅमिन C, 18% फोलेट, 10% व्हिटॅमिन A आणि 10% व्हिटॅमिन E असते. याशिवाय यामध्ये कॅल्शियम, झिंक, लोह आणि मॅग्नेशियमचे देखील काही प्रमाणात असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement