Meaning Of Kasuri : कसुरी मेथी वापरता, पण 'कसुरी' चा नेमका अर्थ काय? 99% लोकांना माहित नाही..

Last Updated:
उन्हाळ्यात स्त्रियांना वाळवण बनवण्याची सवय असते. बरेचसे पदार्थ उन्हाळ्यात वाळवून बनवले जातात. मात्र कसुरी मेथी हिवाळ्यात बनवली जाते. हिवाळ्यात स्वस्तात मिळणारी मेथीची पाने सुकवतात. ही वाळलेली मेथी वर्षभर सहज साठवता येते. ही कसुरी मेथी आहे, असे अनेकांचे मत आहे. तुम्हालाही असे वाटते का? चला जाणून घेऊया यामागचे सत्य.
1/6
वाळवून बनवलेली मेथी कसुरी मेथी असते असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. इतकंच नाही तर प्रत्येक घराघरात वापरली जात असूनही ‘कसूरी मेथी’ला कसुरी मेथी का म्हणतात हे अनेकांना माहीत नाही. तुमच्या स्वयंपाकघरातील या सुगंधी मसाल्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

advertisement
2/6
सर्वप्रथम मेथी सुकवून कसुरी मेथी बनवली जाते किंवा तिला कसुरी मेथी म्हणतात असे मानणारे सर्व लोक चुकीचे आहेत. कसुरी मेथी हा शब्द पाकिस्तानच्या ‘कसौर’ या शहरातून आला आहे. वास्तविक, कसौर हे भारतातील शहर होते, पण फाळणीनंतर कसौर पाकिस्तानात गेले.

3/6
पंजाब आणि राजस्थानच्या अनेक भागात मेथीचे पीक घेतले जाते. पण फाळणीपूर्वी कसाौरमध्ये उगवलेली मेथी ही जगातील सर्वोत्तम मेथी मानली जायची. मेथीची ही जात कसौर जिल्ह्यात घेतली जात असल्याने तिला ‘कसुरी मेथी’ असे संबोधले जाऊ लागले.

4/6
फाळणीनंतर कसौरहून येणारी ही मेथी देशात उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत पंजाबमधील मालेरकोटला आणि राजस्थानच्या नागौरमध्ये मेथीची ही जात पिकवली जाऊ लागली.

5/6
वर्षानुवर्षे आपल्या शेतीच्या प्रगत साधनांमुळे आज जगातील सर्वोत्तम आणि सुवासिक कसुरी मेथी आपल्या देशात पिकते. एवढेच नाही तर आज राजस्थान हे देशातील कसुरी मेथीचे सर्वात मोठे उत्पादक बनले आहे. जगात मेथीचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते.

6/6
कसूरी मेथीमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. हे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. कसुरी मेथी शरीराला डिटॉक्स करण्यास देखील मदत करते. याशिवाय आईचे दूध वाढवण्यासाठी कसुरी मेथी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement