Monsoon Health Tips : पावसाळा सुरु होताच सर्दी खोकल्याने हैराण झालात? 5 घरगुती उपाय ठरतील प्रभावी
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात पावसाने सुरुवातीपासूनच तुफान बॅटिंग करायला सुरुवात केलीये. पावसाळा सुरु होताच वातावरणात झालेल्या बदलांमुळे अनेकजणांना ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार होतात. तेव्हा काही घरगुती सोपे उपाय यावर प्रभावी ठरून तुमची तब्ब्येत सुधरू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकला आणि डोकेदुखीवर निलगिरीचे तेल उपयुक्त ठरू शकते. छातीत साचलेला कफ साफ करण्यासाठी तसेच त्यातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी तुम्ही निलगिरीचे तेल वापरू शकता. पाण्याला उकळी काढून तुम्ही त्यात निलगिरीच्या तेलाचे 4 ते 5 ड्रॉप टाकू शकता आणि डोक्यावर टॉवेल टाकून त्याची वाफ घेऊ शकता.






