Monsoon Picnic Spots : आला पावसाळा, मग चला फिरायला! मुंबईजवळचे कधी न पाहिलेले 10 मस्त ठिकाणं
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पावसाळा ऋतू हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या रम्य वातावरणात निसर्गाच्या कुशीत आपणही पावसाचा आनंद घ्यायला जाव अशी बहुतेकांची इच्छा असते. तेव्हा मुंबई आणि ठाण्याजवळ असे काही पिकनिक 10 स्पॉट्स आहेत जेथे तुम्ही कुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत जाऊ शकता.
येऊर : पावसाळ्यात ठाण्यातील रम्य ठिकाण म्हंटल तर सर्वप्रथम येऊर हिल्स हे नाव येतं. पावसाळ्यात येऊरचं सौंदर्य आणखीच खुलतं. हिरवीगार झाडी, पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे, ओहोटे, वन्यप्राणी इत्यादींनी येथील वातावरण फारच आल्हाददायक होत. या दिवसात सायकलस्वार आणि जॉगर्सची नेहमी रेलचेल असते. तेव्हा एकदिवसीय पावसाळी सहलीसाठी येऊर हा एक चांगला स्पॉट आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कर्जत फार्म हाऊस : पावसाळ्यात तुम्ही कर्जत येथील फार्म हाऊसला सुद्धा भेट देऊ शकता. कर्जत येथे अनेक फार्महाउस असून ते निसर्गाच्या सानिध्यात आहेत. याठिकाणी स्वतंत्र स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधबे असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पिकनिकचा आनंद लुटू शकता. अनेक फार्म हाऊसमध्ये त्तम जेवणाची आणि राहण्याची सोया असते. विकऐंडला या फार्म हाऊसवर जातात.
advertisement
advertisement
संजय गांधी नॅशनल पार्क : बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क हे पावसाळ्यात पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पावसाळयात नॅशनल पार्कमध्ये तुम्ही कान्हेरी लेण्या, सिंहविहार, वनराणी येथे फिरू शकता. या ठिकाणांचे सौंदर्य पावसाळ्यात आणखीनच खुलते. या नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ 40 ते 50 वन्यप्राणी, 250 प्रकारचे पक्षी आणि हजारो प्रकारचे वृक्ष आहेत.
advertisement