Moong Dal benefits: आरोग्यासाठी गुणकारी आहे मूग डाळ, एकदा खाल्ल्याने होतीन अनेक फायदे, दूर पळतील अनेक गंभीर आजार

Last Updated:
Health benefits of Moong Dal in Marathi: भारतीयांच्या स्वयंपाकांमध्ये मूग डाळीचा वापर जास्त प्रमाणात होतो. अगदी वरणाभातापासून ते खिचडीच्या विविध प्रकारांमध्ये मूग डाळीचा वापर केला जातो. मूग डाळ ही अन्य डाळींच्या तुलनेत पचायला हलकी असते. याशिवाय त्यात असलेल्या विविध पोषकतत्त्वांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घेऊयात मूग डाळ खाण्याचे फायदे.
1/7
मूग हे असं एकमात्र कडधान्य आहे जे पिवळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे. दोन्ही मूग डाळींमध्ये प्रथिनं आणि फायबर्स चांगल्या प्रमाणात असतात.

advertisement
2/7
मूग डाळीत भरपूर पोषकतत्वे आढळून येतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मूग डाळ हा चांगला पर्याय ठरू शकतो. मूग डाळीत असलेल्या फायबर्समुळे अन्न पचायलाही मदत होते आणि पोट भरलेलं राहतं त्यामुळे जास्त भूक लागत नाही.

3/7
मूग डाळीमध्ये जीवनसत्त्वं, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजं असतात ज्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते. डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी दैनंदिन आहारात मूग डाळीचं सेवन केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो.

4/7
मूग डाळीमध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतात. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहून हृदयविकारांचा धोका टाळता येऊ शकतो.

5/7
मुगाची डाळ रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्यास जास्त फायदा होतो. कारण भिजवल्यामुळे पचनास मदत करणारे एन्झाइम सक्रिय होतात. त्यामुळे रात्रभर भिजवलेले मूग सकाळी खाणं हा एक चांगला नाश्ता ठरू शकतो.

6/7
मूग डाळ ही पचायला हलकी असते. तसंच त्यात असलेल्या प्रोटिन्समुळे शरीराला लवकर उर्जा मिळू शकते. त्यामुळे आजारी लोकांना मूग डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मूग डाळीचं सूप  प्यायल्याने आजारपणात झालेली शरीराची झीज भरून यायला मदत होते.

7/7
मूग डाळ अनेक प्रकारे खाता येते. मूग डाळ खिचडी, पराठा इतकंच काय तर मूग डाळीच्या पिठाची भजी आणि वडे सुद्धा बनवता येतात. मूग डाळीपासून लाडू आणि हलवाही बनवला जातो. टाईमपास म्हणूनही तळलेली मूग डाळ खाता येते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement