जगभरातील ब्रँडेड शूजची 'इथं' करा स्वस्तात खरेदी, किंमत पाहून बसणार नाही विश्वास
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
जगभरातील ब्रँडेड शूजचं होलसेल मार्केट मुंबईत आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे शूज अगदी स्वस्तात मिळतात.
advertisement
बुटांची खरेदी करताना बजेटचीही काळजी घ्यावी लागते. तुम्हाला ट्रेंडिंग आणि स्टायलिश बुट हवे असतील तर मुंबईतील एका खास जागेची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
साधारण 200 रुपयांपासून ते 1 लाखापर्यंतचे शूज इथं मिळतात. या मार्केटची सुरूवात 30 वर्षांपूर्वी झाली. यापूर्वी कुर्ला स्टेशनच्या बाहेर हे मार्केट होते. पण, तिथं वाहतुकीला अडथळा येऊ लागल्यानं पालिकेनं तेथील बाजार उठवला. त्यानंतर या सर्व विक्रेत्यांनी बाजूला असलेल्या परिसरात आपली दुकानं थाटली, अशी माहिती येथील विक्रेते नितीन कानडे यांनी दिली.
advertisement
या मार्केटध्ये यापूर्वी सेकंड हँड बुट घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असे. आता परिस्थिती बदलली असून इथं ट्रेंडनुसार वेस्टर्न बुट मिळतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'या मार्केटमध्ये तुम्हाला खिशाला परवडतील असे शूज मिळतात. ब्रँड, नॉन ब्रँड, आग्रा, कानपूर, नोएडा, मेड इन इंडिया, मेड इन युएसए असा जगभरातील सर्व माल इथं उपलब्ध आहे.
advertisement
advertisement