Cough Syrup : एका कफ सिरपच्या बाटलीवर औषध कंपनी किती कमवते, मेडिकलवाल्यांना किती पैसे मिळतात?

Last Updated:
Cough Syrup Price Profit : कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली आहे. यामुळे सध्या देशात कफ सिरप सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. या कफ सिरपमुळे औषध कंपन्या आणि मेडिकल स्टोअर्सना किती पैसे मिळतात माहितीये?
1/5
कफ सिरप हे भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या औषधांपैकी एक आहे. पण या औषधातून ते तयार करणाऱ्या औषध कंपन्या आणि विकणारे मेडिकल स्टोअर्स किती कमवतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 

advertisement
2/5
ब्रँडेड कफ सिरप औषध कंपन्यांना जास्त महसूल देतात तर जेनेरिक सिरप मेडिकल स्टोअर्सना जास्त नफा देतात. औषध कंपन्या उत्पादन आणि ब्रँड व्हॅल्यूद्वारे कमाई करतात आणि मेडिकल स्टोअर्स किरकोळ मार्कअपद्वारे कमाई करतात.

3/5
औषध कंपन्यांच्या नफ्यातील एक महत्त्वाचा भाग मार्केटिंगमधून येतो. वैद्यकीय प्रतिनिधी डॉक्टरांना भेटून त्यांच्या विशिष्ट खोकल्याच्या सिरपची शिफारस करतात आणि त्यांना त्यांच्या ब्रँडचं सिरप लिहून देण्यास सांगतात. ब्रँडेड कफ सिरपपासून औषध कंपन्यांना सर्वाधिक नफा मिळतो. उत्पादन खर्च आणि मार्केटिंगवर अवलंबून नफ्याचे प्रमाण 20% ते 30% पर्यंत असते.

4/5
जेनेरिक कफ सिरप बनवणं खूपच स्वस्त आहे. त्याची किंमत साधारणपणे प्रति बाटली 8 रुपये असते आणि ती किरकोळ विक्रेत्यांना 20-30 रुपयाला विकली जाते. त्याची एमआरपी 80 ते 100 रुपयांपर्यंत असते. म्हणजे किरकोळ विक्रेते किंवा मेडिकल स्टोअर्सना जेनेरिक कफ सिरपवर 50% ते 75% पर्यंत नफा मिळतो. हे नफा मार्जिन औषध कंपन्यांपेक्षाही जास्त आहे, असं एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

5/5
सूचना : ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जी फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. औषधांची किंमत त्यामुळे होणारा नफा वेगवेगळा असू शकतो.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement