Women Health Tips : बाळंतपणानंतर महिला किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवू शकतात?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
महिलांचे शरीर प्रत्येक टप्प्यावर बदलत असते. मात्र गरोदरपण आणि बाळंतपण म्हणजेच प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात खूप बदल होतात. त्यामुळे या काळात त्यांना जास्त काळजी घेण्याची गरज असते. म्हणूनच प्रसूतीनंतर महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वीही शरीर निरोगी असल्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तसेच, अनेक महिलांना सिझेरियननंतर शारीरिक संबंध कधी ठेवता येऊ शकतात हे माहीत नसते. सिझेरियन प्रसूतीनंतर काही आठवडे योनीमध्ये काहीही जाऊ नये. पण 6 आठवड्यांनंतरचा काळ हा महिलांना शारीरिक संबंधांसाठी योग्य मानला जातो. परंतु, काही स्महिलांना पूर्वस्थितीत येण्यासाठी यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे त्यांना काही काळ आराम करावा लागतो.
advertisement
काही महिला उशिरा ठीक होतात. त्यामुळे सिझेरियननंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे असतील तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. बाळंतपणानंतर गर्भाशयाचा आकार बदलतो. प्रसूतीनंतर गर्भाशयाला सामान्य आकारात येण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि रक्तस्त्राव थांबायला वेळ लागतो. म्हणून, शरीर शारीरिक संपर्कास सक्षम आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
advertisement
प्रसूतीनंतर 6-12 महिन्यांनी वजन कमी करण्याचा विचार करा. बहुतेक स्त्रिया प्रसूतीनंतर 6 आठवड्यांच्या आत त्यांचे अर्धे वजन कमी करतात. रोजच्या व्यायामासोबत सकस आहार घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. पण धावणे, कठोर व्यायाम करणे आणि घाईघाईने पायऱ्या चढणे पूर्णपणे टाळावे. (इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. कोणतीही कृती करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)