Post Delivery Problems : डिलिव्हरीनंतर शरीरातील हे बदल नसतात सामान्य, असू शकतात गंभीर संकेत! वेळीच लक्ष द्या
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Post-delivery health problems in women : बाळ जन्मल्यानंतर संपूर्ण लक्ष नवजात शिशूकडे जाते, पण अनेकदा आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. डिलिव्हरीनंतर शरीरात होणारे काही बदल नॉर्मल मानले जातात. मात्र तज्ज्ञांच्या मते काही लक्षणे अजिबात सामान्य नसतात. ही लक्षणे वेळेत ओळखून उपचार न घेतल्यास आईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. म्हणूनच प्रसूतीनंतर दिसणाऱ्या काही महत्त्वाच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये.
लाईव्ह हिंदुस्थानला दिलेल्या मुलाखतीत डॉ. आंचल अग्रवाल यांनी सांगितले की, डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये मानसिक आरोग्य असंतुलन मोठ्या प्रमाणात दिसून येते. थोडेफार मूड स्विंग्स सामान्य असू शकतात. पण सतत चिंता, जास्त चिडचिड, उदासीनता, बेचैनी किंवा भावनिक एकटेपणा जाणवणे हे गंभीर संकेत आहेत. काही महिलांना बाळाशी जोडलेपणाच वाटत नाही किंवा दैनंदिन कामांमध्ये रस उरत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पेल्विक भागात सतत दुखणे, जडपणा जाणवणे किंवा हसताना, खोकताना लघवी सुटणे ही लक्षणे पेल्विक फ्लोअर कमकुवत झाल्याची चिन्हे असू शकतात. ही लक्षणे अनेक महिलांमध्ये दिसतात. मात्र योग्य उपचार न घेतल्यास चालणे, बसणे आणि दैनंदिन आरामावर परिणाम होतो. त्यामुळे प्रसूतीनंतर आईच्या शरीरातील प्रत्येक बदल गांभीर्याने घेणे हेच दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.
advertisement








