आरोग्यासाठी फायदेशीर, किंमत फक्त 20 रुपये, दुर्मिळ वनस्पतीचे ज्यूस तुम्ही पिलेच नसेल!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
दिवसाची सुरुवात हेल्दी पेयाने व्हावी हा विचार करून अमरावती मधील प्रदीप गणमोडे यांनी आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या ज्यूसचे स्टॉल सुरू केले आहे. त्यांच्याकडे लौकी, गाजर, तुळशी, कडुनिंब, बीट आणि अनेक बरेच ज्यूस आहे.
उत्तम आरोग्यासाठी आपले खानपान महत्वाचे असते. त्यामुळे आपण सकाळी उठल्यापासून आपल्या खान पानाची सुरवात कशी करतो? ती योग्य आहे का? याचा विचार करणे गरजेचे आहे. दिवसाची सुरवात हेल्दी पेयाने व्हावी हा विचार करून अमरावती मधील प्रदीप गणमोडे यांनी आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या ज्यूसचे स्टॉल सुरू केले आहे. त्यांच्याकडे दुधी, गाजर, तुळशी, कडुनिंब, बीट आणि अनेक बरेच ज्यूस आहे. सकाळी फिरायला येणारे अनेक लोकं हे ज्यूस पितात. त्यामुळे त्यांना अनेक फायदे झालेत असेही ते सांगतात.
advertisement
मित्राची संकल्पना अंमलात आणली : आरोग्यवर्धक ज्यूसबाबत माहिती देताना प्रदिप गडमोडे सांगतात की, मी गेले 9 वर्षापासून लोकांना हे ज्यूस पुरवत आहे. ही संकल्पना मूळ माझ्या मित्राची आहे. त्याने पुण्याला हे ज्यूस सेंटर बघितलं होत. त्यानंतर त्याने येऊन आम्हाला सांगितले. त्यावर आम्ही चर्चा केली. कारण सध्या अनेक आजार उद्भवत आहे.
advertisement
त्यावेळी डॉक्टर वेगवेगळे ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. पण, घरी बनवणार कोण? पिणार कोण? असे लोकं कंटाळा करतात. त्यामुळे आम्ही सात मित्रांनी मिळून ही कल्पना अमलात आणली. गेल्या 9 वर्षांपासून आम्ही अमरावतीमध्ये सात ठिकाणी हे ज्यूस सेंटर सुरू केले आहे. माझ्या सर्व मित्रांचा कृषीमध्ये आणि इतर वेगवेगळ्या फिल्डमध्ये डिप्लोमा केलेला आहे. त्यामुळे या ज्यूससाठी साहित्य मिळवणे आम्हाला सोपे झाले.
advertisement
advertisement
advertisement
20 रुपये ग्लासप्रमाणे हेल्दी ज्यूस : सर्वात आधी आम्ही मोफत ज्यूस वाटपाचा प्रयोग करून बघितला होता. तेव्हा लोकांनी अनेकवेळा ज्यूस घरी नेऊन फेकून दिलेत. लोकांना त्याची किंमतच समजली नव्हती. त्यामुळे आम्ही मग 10 रुपये ग्लासप्रमाणे ज्यूस देण्यास सुरवात केली. नंतर महागाई वाढत गेली आणि आम्ही सुद्धा त्यात 5 रुपयांनी वाढ केली. आता आम्ही 20 रुपये ग्लास प्रमाणे ज्यूसची विक्री करतो.
advertisement
अमरावतीत 7 ठिकाणी शाखा : अमरावतीमध्ये आमच्या सात मित्रांच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. अकोली रेल्वे स्टेशन, मालटेकडी, प्रशांत नगर, छत्री तलाव, रिंग रोड, साई नगर, व्हिएमव्ही यासर्व ठिकाणी ज्यूस सकाळी 6 ते 10 पर्यंत मिळतात. आम्ही सर्वजण सकाळी 3.30 वाजता उठून हे सर्व ताजे ज्यूस तयार करतो आणि आपापल्या पॉइंटला घेऊन येतो. सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रदिप सांगतात.