विदर्भ स्टाईल पद्धतीनं बनवा कुरकुरीत आणि हेल्दी बिट्या; रेसिपी पाहा

Last Updated:
गव्हाच्या सोजी पासून विदर्भ पद्धतीने बिट्या हा पदार्थ बनवला जातो.
1/6
 गहू हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. गव्हापासून बनलेले आपण अनेक पदार्थ बघतो. तसेच सोजी हा देखील एक पदार्थ गव्हापासूनच तयार केला जातो. तर या गव्हाच्या सोजी पासून विदर्भ पद्धतीने बिट्या हा पदार्थ बनवला जातो. अतिशय चवदार कुरकुरीत आणि हेल्दी बिट्या बनविण्यासाठी अगदी सहज उपलब्ध असलेले साहित्य आपल्याला लागणार आहेत. बिट्याची रेसिपी  गृहिणी मीना शिंदे यांनी सांगितली आहे.
गहू हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. गव्हापासून बनलेले आपण अनेक पदार्थ बघतो. तसेच सोजी हा देखील एक पदार्थ गव्हापासूनच तयार केला जातो. तर या गव्हाच्या सोजी पासून विदर्भ पद्धतीने बिट्या हा पदार्थ बनवला जातो. अतिशय चवदार कुरकुरीत आणि हेल्दी बिट्या बनविण्यासाठी अगदी सहज उपलब्ध असलेले साहित्य आपल्याला लागणार आहेत. बिट्याची रेसिपी वर्ध्यातील गृहिणी मीना शिंदे यांनी सांगितली आहे.
advertisement
2/6
बिट्या बनवण्यासाठी साहित्य : 1) 1 वाटी सोजी (गव्हाच्या जाड कण्या) 2) 1 वाटी गव्हाचं पीठ(कणिक) 3) चवीनुसार तिखट, हळद, मीठ, तेल,ओवा आवश्यक आहे.

3/6
सर्वप्रथम गव्हाची सोजी गिरणी वरून दळून आणायची आहे. घरी आल्यावर रवा-मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे. जाड पिठाचा चोथा पाखडून कोंडा बाहेर काढायचा. उरलेल्या पदार्थाला सोजी असं म्हणतात.

4/6
एका परातीत हीच सोजी आणि गव्हाची रोजची कणिक घेऊन तिखट, मीठ , हळद, ओवा आणि छोटे 2 चमचे तेल असं ऍड करून घट्टसर गोळा (अति घट्टही नको आणि अती सैलही नको) तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचे 4 भाग करून ते जाड लाटून घ्यायचे तेल लावून एकावर एक ठेवायचे,आता त्याचा रोल करून घ्यायचा आहे.

5/6
दोन्ही बाजूने फोल्ड करून बंद करून घ्यायचं. आता 10 मिनिटांसाठी हा मळलेला गोळा झाकून ठेवायचा. आता एका कढईत पाणी घेऊन त्यावर तेल लावलेली चाळणी ठेवायची आणि आपण बनवलेला रोल 10 मिनिटे वाफवून घ्यायचा. 10 मिनीटांनी चेक करून घेऊ शकता.

6/6
2 मिनिटांनी त्याचे सारखे गोल काप करून घ्या आणि गरम तेलात तळून घ्या. कुरकुरीत, खुसखुशीत, आणि चविष्ट अशा बिट्या खाण्यासाठी तयार आहे. या बिट्या अशाही टेस्टी लागतात किंवा तुम्ही वांग्याची भाजी,फोडणीची डाळ,किंवा डाळभाजी बरोबर खाऊ शकता.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement