केळीपासून बनवा उपवासाची भन्नाट रेसिपी; बनवण्याची सोपी पद्धत पाहा

Last Updated:
केळांपासून उपवासाची भन्नाट रेसिपी बनवता येते.
1/6
केळी हे फळ आपल्याकडे प्रत्येक घरात असतंच. त्यात उपवास म्हटलं की केळी आलीच. बऱ्याचदा केळी अधिक पिकली की टाकून दिली जातात. पण याच केळांपासून उपवासाची भन्नाट रेसिपी बनवता येते.

advertisement
2/6
 विदर्भात केळीपासून उपवासाचे अपाल बनवले जातात.  येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी अपालची रेसिपी सांगितली आहे.
विदर्भात केळीपासून उपवासाचे अपाल बनवले जातात. वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी अपालची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
3/6
केळीपासून उपवासाचे अपाल बनवण्यासाठी पिकलेली केळी आवश्यक आहेत. त्यासोबतच शिंगाडा पीठ किंवा राजगिरा पीठ, वेलची पूड, गूळ आणि तळण्यासाठी तेल आवश्यक आहे. आपल्या गरजेनुसार हे साहित्य आपण घेऊ शकता.

4/6
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये केळी चांगली एकजीव करून घ्यायची आहेत. तुम्ही ते चमच्याने एकजीव करू शकता किंवा डायरेक्ट मिक्सरमधूनही काढू शकता. आता गॅसवर अर्धा कप पाणी घेऊन त्यात छोटी अर्धी वाटी गूळ ॲड करून गुळ चांगला विरघळल्यानंतर त्यात स्मॅश केलेली केळी ॲड करायची आहेत. लगेच राजगिरा किंवा शिंगाड्याचे पीठ ॲड करून एका परातीत काढून घ्यायचा आहे.

5/6
थोडं कोमट असतानाच गोळा करून घ्यायचा आणि त्याची एक मोठी पोळी लाटून आपल्याला एखाद्या वाटीच्या सहाय्याने सारखे अपाल करून घ्यायचे आहेत.

6/6
 नंतर गरम तेलात तळून घेऊन गरमागरम सर्व्ह करून खाण्यासाठी हे केळीचे उपवासाचे अपाल तयार आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement