किसलेले गाजर अन् संत्राचे काप, अतिशय टेस्टी गाजर बर्फी, उन्हाळ्यात एकदा बनवून पाहाच!

Last Updated:
अनेकजण आपल्या घरी आरोग्यदायी गाजरांचा हलवा बनवतात. पण अगदी सोप्या पद्धतीनं गाजरांची बर्फी देखील बनवता येते.
1/7
अनेक लोकांना गोड पदार्थ खायला आवडतात. गोड पदार्थ म्हटलं की, नेहमी पेढा आणि इतर गोड पदार्थ समोर येतात. पण, उन्हाळ्यात अनेक फळ भाज्या बाजारात येतात. त्यातील गाजर हे अतिशय पौष्टीक आणि आरोग्यदायी मानली जातात. गाजरापासून तुम्ही गाजर बर्फी बनवू शकता.

advertisement
2/7
 अतिशय टेस्टी अशी कमीत कमी साखर वापरून तयार होणारी गाजर बर्फी कोणालाही आवडेल अशीच असते. हीच गाजराची बर्फी बनवण्याची रेसिपी अमरावती येथील गृहिणी सुनिता घुलक्षे यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितली आहे.

3/7
गाजराची बर्फी बनवण्यासाठी साहित्य : किसलेले गाजर, संत्राचे काप, साखर, फूड कलर, विलायची, खवा, बटर पेपर हे साहित्य लागेल.

4/7
बर्फी बनवण्याची कृती : सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवायचा. त्यांनतर पॅनमध्ये संत्राचे काप टाकून घ्यायचे. त्यांनतर ते थोडे मॅश करून घ्यायचे. त्यात साखर टाकून घ्यायची. साखर पूर्ण विरघळली की त्यात गाजराचा किस टाकून घ्यायचा. संत्रा आणि गाजराचा किस चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यात तुम्ही फूड कलर वापरू शकता. तुम्हाला आवडत नसल्यास वापरणे टाळू शकता.

5/7
काही वेळ ते सारण शिजवून घ्यायचं आहे. त्यांनतर त्यात खवा टाकायचा. खवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्यात गडे राहायला नको. खवा 5 ते 10 मिनिट परतवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटनंतर वडीचे सारण तयार होईल. त्यानंतर त्यात विलायची टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं.

6/7
हे सारण बटर पेपरवर टाकून प्लेन करून घ्यायचं आणि अर्धा ते थंड होऊ द्यायचं आहे. अर्धा तासानंतर सारण थंड झाले की त्याची वडी करून घ्यायची. ही वडी थोडी ओलसर राहू द्यायची आहे. त्यामुळे वडी नरम राहील.

7/7
गाजराची बर्फी बनवताना चवीसाठी संत्रा वापरू शकता किंवा आवडत नसल्यास तो वापरला नाही तरी चालेल. त्याचबरोबर साखर सुद्धा तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात कमी जास्त टाकू शकता, असे सुनिता यांनी सांगितले.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement