नाश्त्याला बनवा रवा हांडवो डिश, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल,PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
नाश्त्याला नेहमी पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो. यामुळे पोहे आणि उपमा पेक्षा तुम्ही रवा हांडवो हा एक पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता.
दररोज सकाळी नाश्त्यासाठी काय करावे हा आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो. आपण एकतर पोहे करतो किंवा उपमा करतो. पण नेहमी पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो. यामुळे पोहे आणि उपमा पेक्षा तुम्ही रवा हांडवो हा एक पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता. रवा हांडवो ही एक गुजराती डिश आहे. तर या रवा हांडवोची रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील गृहीणी मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे.
advertisement
advertisement
रवा हांडवो कृती : सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एक वाटी रवा घ्यायचा. त्यामध्ये दही टाकायचं आणि गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण तयार करून घ्यायचं. अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यांनतर दुसऱ्या बाऊलमध्ये जो आपण पालक घेतलेला आहे तो पालक टाकायचा. पालक आधी चांगला चिरून घ्यायचा. त्यानंतर त्या पालकमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, बारीक चिरलेली मिरची, आलं, तिखट, हळद आणि तीन चमचे बेसन पीठ त्यामध्ये टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
advertisement
advertisement
advertisement