विदर्भातील फेमस कुरकुरीत बिट्टी, कमी साहित्यात होईल तयार, लगेच नोट करा रेसिपी

Last Updated:
विदर्भ झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील सर्वात फेमस पदार्थ म्हणजे रोडगे. रोडगे हे जाड गव्हाच्या पिठापासून बनवले जातात.
1/7
विदर्भ झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील सर्वात फेमस पदार्थ म्हणजे रोडगे. रोडगे हे जाड गव्हाच्या पिठापासून बनवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे विदर्भ स्पेशल बिट्टी. ज्यांना रोडगे खायला आवडणार नाहीत त्यांनी बिट्टी तर एक वेळा चाखून बघायलाच पाहिजे. ही कुरकुरीत बिट्टी कशी बनवायची? याबद्दलचं सारिका पापडकर यांनी माहिती सांगितली आहे.

advertisement
2/7
बिट्टीसाठी साहित्य : 2 वाटी गव्हाचे पिठ, 1 वाटी रवा, ओवा, जिरे, मीठ आणि तेल हे साहित्य लागेल.

3/7
कृती : एका भांड्यात गव्हाचे पीठ आणि रवा काढून घ्यायचा. त्यात थोडे तेल घालायचे. त्यानंतर ओवा, जिरे आणि मीठ घालायचे. मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर त्यात पाणी घालून त्याचा गोळा करुन घ्यावे.

4/7
 ते मिश्रण 10 मिनिट ठेऊन द्यावे, जेणेकरून त्यात घातलेला रवा पूणपणे मुरून जाईल. त्यानंतर आता त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या करून घायच्या. या पोळ्या तुम्ही लाटून पण करू शकता आणि हाताने पण करू शकता.

5/7
त्यानंतर बिट्टीला छान लेयर येण्यासाठी या पोळ्या ऐकावर एक ठेवून त्याचा गोळा बनवून घ्यायचा. आता इडली कुकरमध्ये पाणी घालून कुकर गॅसवर ठेवून घ्यायचा. त्यानंतर इडली प्लेटला तेल लावून त्यात हे गोळे ठेवून घ्यायचे आणि कुकर लावून घ्यायचा. 15 ते 20 मिन याला वाफ काढून घ्यायची. नंतर चाकूच्या सहाय्याने चेक करावे. चाकू जर सहज निघत असेल तर हे वाफवून झालेलं आहे, असे समजावे.

6/7
त्यानंतर आता याला थंड होईपर्यंत बाजूला ठेवावे. आता हे थंड झाल्यावर तुम्हाला हवे तसे काप तुम्ही करू शकता. त्यानंतर ते काप म्हणजेच बिट्टी तळून घ्यावे. त्यासाठी कढईमध्ये तेल घाला. तेल मध्यम आचेवर थोड गरम होऊ द्यावे. नंतर त्यात ते काप घालायचे.

7/7
 आता बिट्टी लालसर होईपर्यंत तळून घ्यावे. अशाप्रकारे तुमची बिट्टी तयार होईल. वरण, भात, आलू वांग्याची भाजी करू शकता. अशाप्रकारे तुम्ही विदर्भ स्पेशल बिट्टी खाऊ शकतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement