Perfect Chapati Recipe: चपात्या होतील मऊसूत, 2 घास जास्त जातील, वापरून तर बघा 'या' टिप्स!

Last Updated:
स्वयंपाक बनवणं ही एक कला आहे, ज्यात पारंगत होण्यासाठी लागतो सराव. भाकरी, चपाती जवळपास प्रत्येक घरात दररोज बनवल्या जातात. परंतु काहीजण भाकरी आणि चपाती बनवण्यातच कच्चे असतात, जरी त्यांना इतर रुचकर पदार्थ सहज बनवता येत असतील तरी गोल गरगरीत स्वादिष्ट चपाती त्यांना बनवता येतच नाही. त्यात काहीजणांच्या चपात्या कच्च्या राहतात, कडक होतात. परंतु काळजी करू नका, आज आपण छान मऊसूत लुसलुशीत चपात्या कशा बनवायच्या हेच पाहणार आहोत. 
1/5
कणीक लुसलुशीत असेल तर चपात्याही स्वादिष्ट होतात. त्यामुळे चपातीसाठी गव्हाचं पीठ कोमट पाण्यात मळावं. तसंच कणिकात भरपूर तेल घालावं. त्यामुळे चपात्या फक्त मऊ होत नाहीत, तर अनेक तास तशाच राहतात. चपाती लाटल्यानंतर काय करावं, जाणून घेऊया.

advertisement
2/5
चपात्या तव्यावर ठेवण्यापूर्वी तवा व्यवस्थित गरम होऊ द्यावा. मग चपात्या पूर्ण शिजवून घ्या, नंतर त्यांना शेक द्या. चपात्या कायम मध्यम आचेवर शिजवाव्या. गॅस फास्ट असेल तर चपात्या जळू शकतात, ज्यामुळे कडवट लागतात. तसंच मध्यम आचेवर चपात्या छान फुलतात.

3/5
चपात्या तव्यावरून खाली काढल्यानंतर स्वच्छ सूती कापडात गुंडाळून ठेवाव्या. सूती कापडामुळे चपात्या मऊ होतात. तसंच कणीक जरा मीठाचं पाणी मिसळून मळल्यानंही चपात्या नरम होतात.

4/5
तुम्ही कणीक मळताना त्यात कोमट दूधही घालू शकता. परंतु दूध घातलेल्या चपात्या फार काळ टिकत नाहीत, त्या लगेच बनवून खायाच्या असतात. 

5/5
चपात्या बनवताना तुम्ही त्यावर थोडं तूप घालू शकता. तुपामुळे चपाती मऊ आणि स्वादिष्ट होते. शिवाय तुपाच्या चपात्या सहज चावता येतात. कारण त्या मऊसर असतात. याच काही सोप्या टिप्स वापरून आपण स्वादिष्ट, मऊ चपात्या बनवू शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement