Modak : मोदक बिघडण्याची भीती वाटतेय? उकड काढताना फॉलो करा 'या' 5 सीक्रेट टिप्स, मोदक येतील मऊ आणि लुसलुशीत

Last Updated:
जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवणार असाल, तर घाबरू नका, तांदळाची उकड परफेक्ट जमली की समजा तुमचे अर्धे काम फत्ते झाले. उकड काढताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि चांगले मोदक कसे बनवायचे, याच्या खास टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1/7
गणपती बाप्पाचा सण असो किंवा अंगारकी चतुर्थी, नैवेद्याला 'उकडीचे मोदक' (Ukadichi Modak) नसतील तर काहीतरी अपूर्ण वाटतो. पण उकडीचे मोदक बनवणं हे एक कसब आहे. अनेकदा नवीन शिकणाऱ्या मंडळींना तांदळाची उकड काढताना घाम फुटतो. कधी उकड खूप कोरडी होते, तर कधी जास्त, चुकीच्या पद्धतीमुळे पीठाला चिरा पडतात, ज्यामुळे मोदक फुटतात. जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवणार असाल, तर घाबरू नका, तांदळाची उकड परफेक्ट जमली की समजा तुमचे अर्धे काम फत्ते झाले. उकड काढताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि चांगले मोदक कसे बनवायचे, याच्या खास टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

advertisement
2/7
1. पाण्याचे आणि पिठाचे अचूक प्रमाण (The Golden Ratio)उकड बिघडण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे पाणी आणि पिठाचे चुकीचे प्रमाण. नेहमी 1:1 हे प्रमाण वापरा. म्हणजे जर तुम्ही १ वाटी तांदळाचे पीठ घेणार असाल, तर 1 वाटीच पाणी उकळायला ठेवा. पाणी जास्त झाले तर पीठ चिकट होईल आणि कमी झाले तर मोदक वळताना त्याला चिरा पडतील.
1. पाण्याचे आणि पिठाचे अचूक प्रमाण (The Golden Ratio)उकड बिघडण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे पाणी आणि पिठाचे चुकीचे प्रमाण.नेहमी 1:1 हे प्रमाण वापरा. म्हणजे जर तुम्ही १ वाटी तांदळाचे पीठ घेणार असाल, तर 1 वाटीच पाणी उकळायला ठेवा. पाणी जास्त झाले तर पीठ चिकट होईल आणि कमी झाले तर मोदक वळताना त्याला चिरा पडतील.
advertisement
3/7
2. पाण्याची उकळी आणि खास घटकनुसते पाणी उकळण्यापेक्षा त्यात काही गोष्टी घातल्यास उकड छान येते. पाण्यात 1 चमचा साजूक तूप आणि चिमूटभर मीठ टाका. तुपामुळे पिठाला छान चकाकी येते आणि मोदक हाताला चिकटत नाहीत. मिठामुळे मोदकाच्या पारीला (Covering) छान चव येते.
2. पाण्याची उकळी आणि खास घटकनुसते पाणी उकळण्यापेक्षा त्यात काही गोष्टी घातल्यास उकड छान येते.पाण्यात 1 चमचा साजूक तूप आणि चिमूटभर मीठ टाका. तुपामुळे पिठाला छान चकाकी येते आणि मोदक हाताला चिकटत नाहीत. मिठामुळे मोदकाच्या पारीला (Covering) छान चव येते.
advertisement
4/7
3. पीठ टाकण्याची आणि ढवळण्याची पद्धतपाण्याला चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम कमी करा. पीठ पाण्यात टाकल्यावर लाटण्याने किंवा उलथन्याच्या मागच्या बाजूने ते वेगाने ढवळा (Mix करा). गाठी होऊ देऊ नका. पीठ मिक्स झाले की लगेच गॅस बंद करा आणि त्यावर 5-7 मिनिटे घट्ट झाकण ठेवून वाफ दडपून द्या. या वाफेवरच पीठ अर्धे शिजते.
3. पीठ टाकण्याची आणि ढवळण्याची पद्धतपाण्याला चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम कमी करा.पीठ पाण्यात टाकल्यावर लाटण्याने किंवा उलथन्याच्या मागच्या बाजूने ते वेगाने ढवळा (Mix करा). गाठी होऊ देऊ नका. पीठ मिक्स झाले की लगेच गॅस बंद करा आणि त्यावर 5-7 मिनिटे घट्ट झाकण ठेवून वाफ दडपून द्या. या वाफेवरच पीठ अर्धे शिजते.
advertisement
5/7
4. पीठ मळण्याची योग्य वेळ (The Kneading Process)उकड काढल्यावर ती पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहू नका. पीठ कोमट असतानाच मळायला घ्या. पीठ मळताना हाताला थोडे पाणी आणि तूप लावा. पीठ किमान 5 ते 10 मिनिटे व्यवस्थित मळा. पीठ जितके जास्त एकजीव आणि मऊ मळले जाईल, तितके तुमचे मोदक लुसलुशीत होतील आणि त्यांना तडे जाणार नाहीत.
4. पीठ मळण्याची योग्य वेळ (The Kneading Process)उकड काढल्यावर ती पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहू नका.पीठ कोमट असतानाच मळायला घ्या. पीठ मळताना हाताला थोडे पाणी आणि तूप लावा. पीठ किमान 5 ते 10 मिनिटे व्यवस्थित मळा. पीठ जितके जास्त एकजीव आणि मऊ मळले जाईल, तितके तुमचे मोदक लुसलुशीत होतील आणि त्यांना तडे जाणार नाहीत.
advertisement
6/7
5. तांदळाच्या पिठाची निवडमोदक पांढरेशुभ्र आणि सुवासिक हवे असतील, तर पीठ जुन्या तांदळाचे असावे. शक्य असल्यास आंबेमोहर किंवा बासमती तुकडा तांदळाचे पीठ वापरा. पीठ अतिशय बारीक (मैद्यासारखे) दळलेले असावे. घरच्या घरी पीठ तयार करणार असाल तर तांदूळ धुवून, सावलीत वाळवून मगच दळा.
5. तांदळाच्या पिठाची निवड मोदक पांढरेशुभ्र आणि सुवासिक हवे असतील, तर पीठ जुन्या तांदळाचे असावे. शक्य असल्यास आंबेमोहर किंवा बासमती तुकडा तांदळाचे पीठ वापरा. पीठ अतिशय बारीक (मैद्यासारखे) दळलेले असावे. घरच्या घरी पीठ तयार करणार असाल तर तांदूळ धुवून, सावलीत वाळवून मगच दळा.
advertisement
7/7
जर पीठ खूप कोरडे वाटले, तर पाण्याचा हात लावून पुन्हा मळा. मोदक वळताना पीठ सुकू नये म्हणून त्यावर ओला सुती कपडा झाकून ठेवा.मोदक स्टीम करताना चाळणीला तूप लावा किंवा केळीचे पान ठेवा, जेणेकरून मोदक खाली चिकटणार नाहीत. या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे मोदक अगदी एखाद्या सुगरणीसारखे परफेक्ट होतील. मग यंदाच्या चतुर्थीला बाप्पाला आपल्या हाताने बनवलेल्या सुबक मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवा.

Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement