Skin Care : तुमची त्वचा कोरडी आहे? हे सोपे स्किनकेअर रूटीन सुधारेल त्वचेचा पोत आणि बनवेल मऊ!
Last Updated:
कोरडी किंवा निर्जलित त्वचा ही एक सामान्य समस्या आहे, ज्याचा सामना अनेक लोक करतात. पण त्वचेला कोणत्याही प्रकारच्या ड्रायनेसपासून वाचवण्यासाठी निरोगी स्किनकेअर रूटीन कसे पाळायचे? नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधील 'ऑनसेट मेकॅनिझम अँड फार्मास्युटिकल मॅनेजमेंट ऑफ ड्राय स्किन' नावाच्या संशोधन पेपरनुसार, त्वचेतील ओलावा टिकवून ठेवल्याने आणि नियमित मॉइश्चरायझर वापरल्याने निर्जलित त्वचेवर प्रभावीपणे उपचार करता येतात.
या पेपरमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरडी त्वचा ही विविध परिस्थितींचे लक्षण असू शकते आणि ती सहसा वृद्ध लोकांमध्ये दिसून येते. मात्र, जर कोरड्या त्वचेकडे दुर्लक्ष केले तर यामुळे लालसरपणा, खाज सुटू शकते आणि गंभीर प्रकरणांमध्ये एक्जिमा होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही कोरडी त्वचा रोखण्याचे काही मार्ग जाणून घेण्यास उत्सुक आहात का? दररोज काही मिनिटे काढून हे सौम्य स्किनकेअर रूटीन पाळा.
advertisement
क्लींजिंग : प्रभावी स्किनकेअर रूटीनमधील पहिला टप्पा म्हणजे क्लींजिंग. हे अतिरिक्त सीबम, बंद झालेली छिद्रे आणि कोणतेही अतिरिक्त तेल, घाण, मेकअप किंवा सनस्क्रीन काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे. तुमची त्वचा स्वच्छ आणि पुढील स्टेप्ससाठी तयार नसेल तर तुम्ही स्किनकेअर पुढे चालू ठेवू नये. मात्र तुमच्या चेहऱ्यासाठी सौम्य, पीएच-अनुकूल क्लींजर निवडा.
advertisement
advertisement
मॉइश्चरायझिंग : तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असे सौम्य मॉइश्चरायझर वापरणे ही तुमच्या स्किनकेअर रूटीनमधील तिसरी पायरी आहे. मॉइश्चरायझर निवडताना हायलुरोनिक ऍसिड, सेरामाइड्स, आणि स्किन पेप्टाइड्स यांसारख्या घटकांचा शोध घ्या. जर तुम्ही soothing मॉइश्चरायझर शोधत असाल, तर सेंटेला एशियाटिका, नियासिनमाइड, कोरफड आणि इतर घटक असलेले मॉइश्चरायझर पहा.
advertisement
सनस्क्रीन लावा : गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या सर्वात लोकप्रिय सौंदर्य ट्रेंडपैकी एक, सूर्यप्रकाशातील हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी चांगल्या दर्जाचे, किमान SPF 30 असलेले सनस्क्रीन प्रभावीपणे वापरले जाऊ शकते. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असलेले सनस्क्रीन तुम्हाला बाजारात मिळेल. वेगवेगळ्या उत्पादनांचा अनुभव घेणे महत्त्वाचे आहे.


