Smoothie Recipe : कामाच्या धावपळीतही राहाल फिट! सोप्या स्मूदी रेसिपीजने मिळेल भरपूर ऊर्जा..
Last Updated:
हल्ली लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत. म्हणून लोक आपल्या खाण्याकडे जास्त लक्ष देतात. मात्र बऱ्याचदा कामाच्या धावपळीत नाश्ता बनवण्यासाठी फार वेळ मिळत नाही. अशावेळी आपल्याला कमी वेळेत तयार होणाऱ्या पदार्थंची गरज असते आणि त्यासाठी स्मूदीपेक्षा उत्तम पर्याय कोणता असू शकतो? आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या रेसिपीज सांगणार आहोत.
advertisement
बेरी स्मूदी : ही स्मूदी बनवण्यासाठी तुम्हाला 1 कप मिश्रित बेरीज (स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी), 1 केळी, 1 कप ग्रीक योगर्ट, 1 चमचा चिया सीड्स, 1 कप बदामाचे दूध लागेल. स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व साहित्य बारीक आणि मऊसूत होईपर्यंत ब्लेंड करा. तुम्हाला थंड स्मूदी हवी असल्यास बर्फ घालू शकता. अशाप्रकारे तुमची स्मूदी तयार झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ट्रॉपिकल स्मूदी : ही स्मूदी बनवण्यासाठी 1 कप गोठलेला आंबा, 1 केळी, 1/2 कप अननस, 1/2 कप संत्र्याचा रस, 1/2 कप नारळाचे पाणी लागेल. स्मूदी बनवण्यासाठी सर्वात सोपी आहे आणि निश्चितपणे खूप चविष्ट देखील आहे. सुरुवातीला सर्व फळे एकत्र मिसळा. त्यानंतर नारळाचे पाणी घाला आणि पुन्हा मिसळा. यानंतर तुमची स्मूदी तयार आहे.
advertisement
ट्रॉपिकल स्मूदी फायदे : ही ट्रॉपिकल स्मूदी एक फ्रेश आणि हायड्रेटिंग पेय आहे, जे गरम उन्हाळ्याच्या दिवसासाठी अगदी योग्य आहे. आंबा जीवनसत्त्वे 'ए' आणि 'सी'ने अत्यंत समृद्ध आहे, तर अननस ब्रोमेलेन प्रदान करते, जे पचनास मदत करणारे एन्झाइम आहे. संत्र्याचा ज्यूस जीवनसत्त्व 'सी'ने भरपूर आहे आणि नारळाचे पाणी इलेक्ट्रोलाइट्सचा चांगला स्रोत आहे.


