हिवाळा असो किंवा उन्हाळा, सुट्टीसाठी एव्हरग्रीन आहे हे डेस्टिनेशन!

Last Updated:
आपण आयुष्यात कितीही यश मिळवलं, तरी शांतता आपल्याला निसर्गातूनच मिळते. म्हणूनच वर्षभरातून एकदा का होईना पण कुठेतरी फिरायला जायलाच हवंच. त्यातूनच वर्षभर काम करण्याची ऊर्जा आपल्याला मिळते.
1/5
उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनपासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर आहे उत्तरकाशी जिल्हा. शांत आणि सुंदर वातावरणासाठी या जिल्ह्याला नक्की भेट द्या. शिवाय इथं आपण ट्रेकिंगही करू शकता. समुद्रतळापासून 3556 मीटर उंचावर असलेल्या या जागेला चारही बाजूंनी घेरलंय जंगलांनी.

advertisement
2/5
हिमालयाचं खरं सौंदर्य अनुभवण्यासाठी आपण भेट देऊ शकता उत्तराखंडच्या कानातालला. समुद्रापासून जवळपास 8500 मीटर उंचावर असलेल्या या ठिकाणी अगदी स्वर्गसुखाचा अनुभव घेता येतो.

3/5
तुम्हाला एक संध्याकाळ अशी हवी असेल की तुम्ही तुमच्या खिडकीत बसलाय आणि आजूबाजूला विदेशी पक्ष्यांचा नुसता किलबिलाट ऐकू येतोय. शिवाय आकाशात उडतानाच नाही तर पाण्यात पोहोतानाही पक्षी पाहायला मिळताहेत. अशी निवांत सुंदर संध्याकाळ अनुभवायची असेल, तर भेट द्या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या सीमाभागात येणाऱ्या आसन बैराजला.

4/5
हिवाळ्यात हिरव्यागार साडीवर पांढरेशुभ्र मोती असं अत्यंत सुरेख दृश्य अनुभवायचं असेल, तर भेट द्या उत्तराखंडच्या धनोल्टी भागाला. धनोल्टी इको पार्कमध्येदेखील आपण सुंदर निसर्ग अनुभवू शकता.

5/5
शांतता, ज्ञान, अध्यात्म आणि रोमांचक असं वातावरण अनुभवायचं असेल, तर आपण देहरादून जनपदमध्ये असलेल्या चकराता भागाला भेट देऊ शकता. इथं आपण घनदाट वनराई, उंचच उंच पर्वतरांगा अगदी जवळून पाहू शकता. शिवाय इथं अनेक प्राचीन मंदिरं आणि ऐतिहासिक स्थळंदेखील आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement