Labubu Rakhi: यंदा लबूबू राखीची क्रेझ, सोशल मीडियानंतर बाजारपेठेतही धुमाकूळ
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Labubu Rakhi: इन्स्टाग्राम आणि विविध सोशल मीडियावर लबूबू कॅरेक्टरच्या व्हिडीओंना मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता, अनेक राखी उत्पादकांनी यावर्षी या थीमवर राख्या सादर केल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर: रक्षाबंधन अवघ्या काही तासांवर आले असून, बाजारपेठा पारंपरिक राख्यांनी फुलल्या आहेत. मात्र, यंदाच्या राखी खरेदीत लबूबू राखीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ही राखी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातील ग्राहक या राख्यांकडे आकर्षित होत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


