Cleaning Tips : कितीही जिद्दी डाग असो, फक्त 10 रुपयांत चमकेल आरसा! या युक्त्या वापरून पाहाच
- Published by:
- local18
Last Updated:
Mirror Cleaning Hacks : आपल्या दिवसाची सुरुवात आरशामध्ये स्वतःला पाहून होते. घराबाहेर पडताना सर्वात आधी आपण आरसा पाहतो. अशात जर घरातील आरसा खराब असेल त्यावर डाग पडलेले असतील तर आपला चेहरा नीट दिसत नाही. मात्र कधीकधी आपण तो कितीही स्वच्छ केला तरी डाग जात नाहीत. अशावेळी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. या उपायांनी काही वेळातच आरसा नव्यासारखा चमकू लागेल.
आरशात पाहण्याची सवय कोणाला नसते. आपण कुठेही जाताना आधी आरशात पाहतो. दिवसातून किमान एकदा तरी आपण आरशात पाहतो. असा हा आरसा आपल्या दैनंदिन आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. मात्र बऱ्याचदा आरशावर पडलेले डाग काही केल्या निघत नाही. तेव्हा आरशात आपल्याला स्पष्ट दिसत नाही. हेच डाग काढण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
व्हिनेगरचा वापर : व्हिनेगर वापरल्याशिवाय कोणतेही घरातील काम पूर्ण होत नाही. घरातील कोणत्याही वस्तू स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आवश्यक आहे. एक चमचा व्हिनेगर दोन चमचे पाण्यात मिसळा. ते संपूर्ण आरशावर लावा आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर डाग काढून टाकण्यासाठी वर्तमानपत्राने चांगले पुसून घ्या आणि आरसा चमकवा.
advertisement
advertisement
advertisement