दिवाळीनिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, ‘या’ मार्गावर धावणार जादा बसेस
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीच्या काळात बससेवेवर पडणारा ताण लक्ष्यात घेता बसने प्रवासा करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने एक खुशखबर दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर 7 ते 11 नोव्हेंबर या काळात शिवशाही, आसनी व साधारण आसनी अश्या स्वरूपात नियमित फेऱ्यांशिवाय जादा फेऱ्या सोडण्यात येतील. तसेच 15 नोव्हेंबरपासून गणेशपेठ बसस्थानक येथून दुपारी 1, 3, 4 व सायंकाळी 6 वाजताच्या पुण्यासाठीच्या नियमित सेवांशिवाय सायंकाळी 5 व 7 वाजता बसेस सोडल्या जातील. प्रवासी वाढल्यास आणखी बसेसची व्यवस्था करण्यात येईल, असे एसटी महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
advertisement
advertisement