Chef Kitchen Tips : चहा बनवताना भांडंही महत्त्वाचं, शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं कोणतं वापरायचं

Last Updated:
Chef Kitchen Tips In Marathi : चहा बनवताना पाणी, साखर, चहापावडर यांच्या प्रमाणाइतकंच त्यासाठी वापरलं जाणारं भांडंही महत्त्वाचं आहे. कोणतं आणि कसं भांडं वापरायचं ते शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं आहे.
1/5
चहा बनवायला कितीही सोपा वाटत असला तरी तो सगळ्यांना जमतो असा नाही. चहामध्ये साखर, चहापावडर टाकण्याची आणि चहा उकळण्याची वेळ महत्त्वाची असते. इतकंच नव्हे तर चहा तुम्ही कशामध्ये बनवत आहात ते भांडंही महत्त्वाचं आहे.

advertisement
2/5
तसं बहुतेक घरामध्ये चहाचं भांडं ठरलेलं असतं. दररोज त्यामध्येच चहा बनतो. पण घरातील माणसांच्या संख्येनुसार त्याच प्रमाणात चहा बनेल इतकं हे भांडं असतं. मग कधी पाहुणे किंवा जास्त माणसं घरी आली की मग मात्र हे चहाचं भांडं बदलतं.

3/5
एरवी दुसऱ्या कोणत्या तरी पदार्थासाठी वापरत असलेलं एखादं मोठं भांडं मग आपण चहासाठी वापरतो. पण यामुळे चहाची चव बिघडू शकते, असं शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं.

4/5
चहा कशात बनवायचा, चहाचं भांडं कसं असावं याबाबत शेफ विष्णू मनोहर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या युट्यब चॅनेलवर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

5/5
शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं की, दुसऱ्या कोणत्या भांड्यात जर तुम्ही चहा बनवणार असाल तर आधी त्या भांड्यात साधं पाणी उकळून घ्या आणि फेकून द्या. त्यानंतर चहासाठी दुसरं पाणी त्यात ओता. यामुळे भांड्यामध्ये आधी कोणता पदार्थ बनवला गेला असेल तर त्याची चव किंवा वास त्या चहामध्ये उतरणार नाही.

Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement