Mango : घरी आणलेले आंबे खाण्यापूर्वी पाण्यात का बुडवून ठेवावेत? 99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
अनेक जण आंबे खाण्याआधी ते काही तास पाण्यात बुडवून ठेवतात. त्यामागेही शास्त्रीय कारण आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागते ती कैरी, कलिंगड अशा फळांच्या आगमनाने. काहीच दिवसांत आंबे बाजारात येतात. वास्तविक आंबा हे फळ उष्ण प्रकृतीचं असतं; मात्र ते उन्हाळ्यातच येतं. त्यामुळे आंबे खाताना ही बाब लक्षात ठेवावी लागते. अनेक जण आंबे खाण्याआधी ते काही तास पाण्यात बुडवून ठेवतात. त्यामागेही शास्त्रीय कारण आहे.
advertisement
केशर, पायरी, दशहरा, लंगडा, हापूस अशा आंब्याच्या अनेक प्रजाती आहेत. प्रत्येक जातीच्या आंब्याचा स्वाद वेगवेगळा असतो. आंबा खाण्याच्याही निरनिराळ्या पद्धती आहेत. तो किती प्रमाणात खावा, तसंच त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतील याचेही काही नियम असतात. आजकाल आंबे कृत्रिमरीत्याही पिकवलेले असतात. ते ओळखण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यापैकीच एक म्हणजे आंबे खाण्याआधी ते काही तास पाण्यात बुडवून ठेवले जातात. असं म्हणतात, की पाण्यात बुडवून ठेवल्यानं आंबा प्रकृतीला बाधत नाही. यामागे शास्त्रीय कारणही आहे.
advertisement
आंबा पाण्यात बुडवून ठेवण्याच्या पद्धतीबद्दल इंडियन एक्स्प्रेसने एक रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार, जिंदल नेचरक्युअर इन्स्टिट्यूटच्या प्रमुख आहारतज्ज्ञ सुषमा पी.एस. यांनी म्हटलंय, की खाण्याआधी आंबे एक तासभर पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातल्या फायटिक अॅसिडचं प्रमाण खूप कमी होतं. हे फायटिक अॅसिड शरीरात खनिजांचं शोषण कमी करतं. लोह, जस्त आणि कॅल्शियमसारखी खनिजं शोषून घेण्याची शरीराची क्षमता ते कमी करतं. आंबे एक ते दोन तास पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातलं अतिरिक्त फायटिक अॅसिड कमी होतं. त्यामुळे पोषणमूल्यं शरीरात योग्य पद्धतीनं शोषून घेतली जातात.
advertisement
advertisement
advertisement