Life Changing Habits : आजच या 5 गोष्टी करायला सुरुवात करा, तणाव वगैरे सर्व गोष्टी होतील दूर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Life Changing Habits : नवीन वर्ष 2024 सुरू झाले असून आता पहिला महिना हा अर्धा झाला आहे. जर तुमचे 2023 चांगले गेले नसेल किंवा तुम्हाला 2024 मध्ये आणखी चांगले करायचे असेल तर आजच या उत्तम सवयी अंगीकारा. यामुळे 2024 च्या शेवटी तुम्ही हे वर्ष एका वाक्यात छान गेले असे म्हणू शकाल. (शिखा श्रेया, प्रतिनिधी)
झारखंडची राजधानी रांची येथील आयुर्वेदिक डॉ. वीके पांडे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कमीत कमी एक तास ध्यान नक्की करा. तसेच तुम्ही 2 मिनिटांपासून सुरुवात करू शकतात. तुम्ही पाहाल की वर्षाच्या शेवटी तुम्ही 1 तास ध्यानपर्यंत पोहोचले असाल. यामुळे तुम्हाला फक्त आतूनच आराम वाटणार नाही तर यासोबतच तुमच्या जीवनातून तणाव आणि चिंता नाहीशी होईल. तुमच्या कामात कार्यक्षमता दिसून येईल. चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल.
advertisement
advertisement
नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. ज्या लोकांच्या बोलण्याने तुम्हाला टेंशन, तणाव किंवा तुम्ही दुःखी होत असाल, अशा लोकांपासून अंतर ठेवा आणि जे सकारात्मक आहेत आणि ज्यांच्याकडे आयुष्यात पुढे जाण्याची उर्मी आहे, अशा लोकांशी स्वतःला जोडून घ्या. तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही जीवनाची मोठी ध्येये सहजपणे ठरवू शकाल, असे तुम्हाला दिसेल.
advertisement
शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितके शांत राहाल तितके तुम्ही निरीक्षण करू शकाल. तुम्ही जास्त बोललात तर तुम्हाला कुणीही सहजपणे फसवू शकते. म्हणून, आपले शब्द शक्य तितक्या विचारपूर्वक निवडा आणि प्रत्येक शब्द जेव्हा खूप महत्त्वाचा असेल तेव्हाच बोला. तुम्हाला दिसेल की यामुळे तुमच्या 90% उर्जेची बचत होईल आणि तुम्ही ती ऊर्जा तुमच्या ध्येयासाठी वापरू शकता आणि तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवेल.
advertisement
काम करण्यापूर्वी दररोज किमान 10 पाने वाचा. यामुळे वाचनाची सवय वाढेल तसेच तुमच्या ज्ञानात नवीन माहितीची भर पडेल. यामुळे तुमच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्हाला अवघड वाटणारी गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करा. जसे तुम्ही वाचता तसतसे गोष्टी तुम्ही कधीही विचार केल्यापेक्षा सोप्या होत जातील, असे तुम्हाला दिसेल.