Amravati News: स्वप्न शांत बसू देत नव्हतं, उभारलं प्रॉडक्शन हाऊस, शेतकरी पुत्राची कहाणी

Last Updated:
Amravati News: मध्यम वर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुरागला लहानपणापासूनच सिनेक्षेत्राची आवड होती.
1/5
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील काजळी या छोट्याशा गावात अनुराग दळवी नावाचा एक तरुण राहतो. लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशी त्यांची ओळख. मध्यम वर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुरागला लहानपणापासूनच सिनेक्षेत्राची आवड होती. आई- वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, स्वतःचं स्वप्न त्याला शांत बसू देत नव्हतं. त्यासाठी तो पुण्याला गेला आणि प्रयत्न सुरू केले. अथक प्रयत्नानंतर मराठी चित्रपट सृष्टीत एक लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून त्याला ओळख मिळाली.

advertisement
2/5
लहानपणापासून सिनेमाची आवड : अनुराग दळवीशी लोकल18 ने संवाद साधला. अनुराग म्हणाला,
लहानपणापासून सिनेमाची आवड : अनुराग दळवीशी लोकल18 ने संवाद साधला. अनुराग म्हणाला, "मी चांदूर बाजार तालुक्यातील काजळी या गावचा एका मध्यम वर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे गावातील शाळेत झालं. उच्च शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झालं. त्यानंतर नागपूर येथून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. मी इंजिनिअर व्हावं हे आई वडिलांचं स्वप्न होतं. पण, माझं स्वप्न सिनेक्षेत्रात काम करण्याचं होतं.
advertisement
3/5
अगोदर आई वडिलांच स्वप्न पूर्ण करून मी माझ्या स्वप्नांना पंख दिले. लहान असताना मी शाळेतील नाटकात काम करत होतो. त्यानंतर गावातील प्रत्येक कार्यक्रमात देखील माझा सहभाग नोंदवत होतो. यामुळे मी माझं स्वप्न जिवंत ठेवू शकलो. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर माझे विविध प्रयोग सुरू होते. मिळेल ते काम मी करत होतो. स्क्रिप्ट लिहणं आणि सिनेक्षेत्रात छोटी-मोठी कामं सुरू ठेवली. मुंबईतही एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केलं.
अगोदर आई वडिलांच स्वप्न पूर्ण करून मी माझ्या स्वप्नांना पंख दिले. लहान असताना मी शाळेतील नाटकात काम करत होतो. त्यानंतर गावातील प्रत्येक कार्यक्रमात देखील माझा सहभाग नोंदवत होतो. यामुळे मी माझं स्वप्न जिवंत ठेवू शकलो. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर माझे विविध प्रयोग सुरू होते. मिळेल ते काम मी करत होतो. स्क्रिप्ट लिहणं आणि सिनेक्षेत्रात छोटी-मोठी कामं सुरू ठेवली. मुंबईतही एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केलं."
advertisement
4/5
मुंबईत नामांकित प्रॉडक्शन हाउसमध्ये काम केल्यानंतर अनुरागने स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये त्याने 'पिलग्रीम पिक्चर्स प्रॉडक्शन हाउस'ची स्थापना केली. त्यानंतर विविध शॉर्टफिल्म बनवल्या आणि दोन चित्रपटांची निर्मिती केली. 'एका ब्रेकअपची गोष्ट' हा त्याची निर्मिती असलेला पहिला चित्रपट आहे. त्यानंतर त्याने 'पुन्हा एकदा' या चित्रपटाची देखील निर्मिती केली. त्याची 'भरपाई' ही शॉर्टफिल्म अतिशय लोकप्रिय ठरली. ही शॉर्टफिल्म विदर्भातील कर्ज बाजारी शेतकऱ्यावर आधारित होती. सध्या तो दोन चित्रपटांवर काम करत आहे. त्यात देखील विदर्भातील परिस्थिती दर्शवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अनुरागने दिली.

5/5
अनुरागच्या 'भरपाई' या शॉर्टफिल्मला 9 जून 2024 च्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट इंडियन स्क्रीन प्ले अवार्ड मिळाला. तसेच अनेक फेस्टिवलसाठी देखील या शॉर्टफिल्मची निवड झाली. क्वालालंपूर इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स, कलाकारी फिल्म फेस्टिवल, चेन्नई वर्ल्ड सिनेमा फेस्टिवल, डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टिवल आणि नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी देखील या शॉर्टफिल्मची निवड झाली आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement