लग्नात गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फक्त 30 रुपयांपासून वस्तू, अमरावतीत 'इथं' करा खरेदी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
एखाद्याच्या लग्नात हटके गिफ्ट देण्याचा विचार अनेकजण करत असतात. अशांसाठी अमरावतीत तांबे आणि पितळेत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
लग्नसराईचा सिझण सुरू असून नव दाम्पत्याला गिफ्ट काय द्यायचं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. फोटो फ्रेम आणि इतर नवनवीन वस्तू सध्या गिफ्ट म्हणून दिल्या जात आहे. प्रत्येकाने त्याच वस्तू देण्याऐवजी तुमच्यासाठी एक खास ऑप्शन म्हणून तांबे पितळेची भांडी, मूर्ती किंवा इतर नवनवीन वस्तू देखील उत्तम पर्याय ठरू शकतात.
advertisement
advertisement
अमरावतीतील अंबादेवी परिसरात अशोक स्टोअर्स हे दुकान आहे. याठिकाणी तांब्या-पितळेच्या अनेक आकर्षक वस्तू मिळतात. आमच्याकडे तांबे पितळीच्या सर्व वस्तू उपलब्ध आहेत. अगदी 30 रुपयांपासून ते 25 ते 30 हजार रुपये किमतीच्या सर्व वस्तू तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळतील. आता लग्नसराईचा सिजन आहे. तेव्हा गिफ्ट म्हणून काही वस्तू तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर सप्तपदी, कन्यादान करताना सुद्धा अनेक भांडे, मूर्ती लागतात ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, असं सुनंदा गुडघे सांगतात.
advertisement
देव्हाऱ्यात लागणारी घंटी आमच्याकडे उपलब्ध आहेत. अगदी 30 रुपयांपासून ते 7 हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारच्या घंटी इथं मिळतील. त्यानंतर छोट्या छोट्या तांबे पितळीच्या प्लेटसुद्धा 35 रुपयांपासून उपलब्ध आहेत. त्यानंतर 100 रुपयांपासून कृष्ण, गणपती, स्वामी समर्थ आणि देवाच्या मूर्ती इथं उपलब्ध आहेत. या मूर्ती सुद्धा साईजनुसार किमतीमध्ये कमी जास्त तुम्हाला मिळतील.
advertisement
advertisement
advertisement