मुलं शिकावीत म्हणून ऊसतोड कामगार एकत्र, शाळेसाठी केली मोठी गोष्ट!
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
शाळा टिकली पाहिजे आणि पोरं शिकली पाहिजेत म्हणत बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी आदर्शवत निर्णय घेतला आहे.
शाळा टिकली पाहिजे आणि पोरं शिकली पाहिजेत म्हणत बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी आदर्शवत निर्णय घेतला आहे. ऊसतोड मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कारेगव्हाण येथील गावकऱ्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेला मोठा निधी दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कारेगव्हाणच्या शाळेत मे 2023 मध्ये विकास परदेशी गुरुजी रूजू झाले. त्यांनी गावकऱ्यांसोबत बैठक घेतली आणि शाळेच्या स्थितीबाबत माहिती दिली. यावर ऊसतोड मजूर असणाऱ्या गावकऱ्यांनी एकत्र येत शाळेचं रूपडं पालटण्याचा संकल्प केला. गावकऱ्यांनी एकत्र येत आपआपल्या परीने शाळेसाठी निधी गोळा केला. सगळ्यांच्या प्रयत्नातून 1 लाख 35 हजार रुपयांचा निधी गोळा झाला.
advertisement
advertisement