Beed Weather: सावधान! हवामानात मोठे बदल, बीड, नांदेडकरांना धोका, नेमका अलर्ट काय?
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Weather: एप्रिलअखेर मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज बीड, लातूर, नांदेडमधील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
बीड जिल्ह्यात आज कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये बीडमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून बचाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
लातूर जिल्ह्यातही आज तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. हवामान विभागानुसार लातूरमध्ये पुढील काही दिवस तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. सध्या आकाश निरभ्र असून पावसाची शक्यता नसल्यामुळे उष्णतेचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी व संध्याकाळीच घराबाहेर पडावे असा सल्ला दिला जात आहे.
advertisement
advertisement







