Poultry Farming : आरोग्यासाठी लाभदायक आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; चिनी कोंबडीचे वैशिष्ट्य जाणून घ्या...!
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Poultry Farming China Hen : अवघ्या 40 दिवसांच्या आत विक्रीसाठी तयार होणारी चिनी कोंबडी आली असून शेतकऱ्यांसाठी ती सोन्याची अंडी देणारी ठरत आहे. या चिनी कोंबडीची अंडी आणि चिकन आरोग्यदायी मानलं जातं, त्यामुळे कोंबडीला मोठी असते. चिनी कोंबडी ही मूळतः चीनमधील ब्रॉयलर प्रकारातील असून तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय वेगाने वाढ होणं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
1990–95 च्या दशकात भारतात चिनी कोंबडीची एन्ट्री झाली आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतून ती देशभर पसरली. कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी ही कोंबडी पोल्ट्री उद्योगाच्या वेगवान वाढीमागचं प्रमुख कारण ठरली. मात्र, तिची रोगप्रतिकारकता देशी कोंबडीपेक्षा कमी असल्याने योग्य लसीकरण आणि शास्त्रीय पद्धतीने निगा राखणं अत्यावश्यक आहे.







