Weather Alert: मराठवाड्यात पुन्हा पावसाचं धुमशान, 72 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रतील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. गेल्या 2-3 दिवसांच्या ब्रेकनंतर मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मागील आठवडाभर महाराष्ट्रभर पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक ठिकाणी महापुराची स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नद्यांना पूर आला, रस्ते वाहून गेले, आणि जनजीवन विस्कळीत झाले. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
विजयादशीच्या दिवशी परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदी काठावरील गावांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
advertisement