Weather Alert: शनिवारी हायअलर्ट! मराठवाड्यावर संकटाचे ढग, नांदेड, लातूरसह या जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यात देखील 3 जिल्ह्यांना ऑरेंज तर 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 3 दिवस कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस धो धो कोसळणार आहे. मराठवाड्याचं टेन्शन वाढवणारी बातमी असून आज काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 27 सप्टेंबर रोजी 3 जिल्ह्यांना ऑरेंज तर 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. त्यामुळे पुढील 24 तास नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
शनिवारी मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नांदेड, लातूरसह धाराशिवमध्ये पुन्हा अतिमुसळधार पावसाची शक्यता असून पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नांदेडमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
advertisement
advertisement
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. नद्यांना आलेल्या पुरात मोठं नुकसान झालं असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे. काही जिल्ह्यांत पुढील 24 तास अतिवृष्टीचा इशारा असून छ. संभाजीनगरमध्ये रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात 27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसात जोर मराठवाड्यातही जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच पूरस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. हवामान विभागाच्या वेगवेगळ्या संदेशावर लक्ष ठेवावे आणि आपल्या जीविताची, जनावरांची आणि पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







