Weather Alert: मराठवाड्यात पुन्हा हवापालट, ताशी 40 किमीने वारे वाहणार, धो धो कोसळणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
1/5
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून कोकणासह मराठवाड्यात देखील पाऊस परतला आहे. आज मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने 5 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गुरुवाचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांना बुधवारी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आज पुन्हा या भागात जोरदार पावसाची शक्यता असून छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.

3/5
हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह जोरदार पाऊस होईल.

4/5
दुसरीकडे मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना आज कोणताही महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. परंतु, याठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहील.

5/5
मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने यंदा गेल्या काही दिवसांत उघडीप घेतली होती. परंतु, 2-3 दिवसांपासून पुन्हा पाऊस परतला आहे. पुढील 24 तास ही स्थिती कायम राहणार असून त्यानंतर मात्र पुन्हा पाऊस ओसरणार आहे. शुक्रवारपासून पुढील 3 दिवस कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा इशारा नाही.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement