advertisement

Weather Alert: 24 तास पावसाचे, मराठवाड्यावर पुन्हा संकट, छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
महाराष्ट्रात दिवाळीनंतरही पावसाचा जोर कायम आहे. मान्सूनने माघार घेतल्यानंतर मराठवाड्यावर देखील अवकाळी संकट घोंघावत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोसाट्याचा वारा आणि विजांसह काही ठिकाणी जोरदार पाऊस होतोय. आज, 26 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील काही भागात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत आज विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अंदाज आहे.

3/5
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. शनिवारी याठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला होता. परंतु, आज कोणताही महत्त्वाचा इशारा देण्यात आलेला नाही. नांदेडमध्ये सोमवारी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

4/5
मराठवाड्यात सोमवारपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव आणि नांदेड वगळता सोमवारी कोणत्याही जिल्ह्याला यलो अलर्ट नाही.

5/5
दरम्यान, यंदा सप्टेंबरमध्ये मराठाड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीने मोठे नुकसान झाले. त्यातच दिवाळीनंतरही अवकाळी संकट घोंघावत असून शेतकरी संकटात आहे. आज सहा जिल्ह्यांना अलर्ट असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement