Marathwada Rain: धो धो पाऊस की महिनाअखेर विश्रांती, मराठवाड्यातील आजचं हवामान कसं? IMD कडून अपडेट

Last Updated:
Marathwada Rain: महिनाअखेरीस छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 31 जुलैचा 8 जिल्ह्यांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी, काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरी कोसळत आहेत. आज 31 जुलै रोजी मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे. पण कोणत्याही जिल्ह्याला मुसळदार पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुलैअखेर हवामानात मोठे बदल जाणवत असून आज तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे.

3/5
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मराठवाड्यात पावसाने ओढ दिली होती. परंतु, त्यानंतर काही भागात मुसळधार पाऊस झाला. आता श्रावणात हवामानात मोठे बदल जाणवत असून जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत पावसाने उघडीप घेतलीये. या ठिकाणी पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती कायम राहील.

4/5
मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांत देखील पावसाने दडी मारली आहे. या जिल्ह्यांत हवा बदलली असून पुढील काही काळ मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही. मात्र काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या सरी बरसतील.

5/5
मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेले धरण जायकवाडी धरण 85 टक्के पेक्षा जास्त भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ढगाळ हवामानाचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement