Weather Alert: मराठवाड्यात गारठा वाढणार, पण दुपारी सूर्यदेव जाळ काढणार, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Weather update: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता असून येत्या दोन दिवसांत गारठा वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
राज्यासह मराठवाड्यातील तापमानात सातत्याने चढउतार होत आहेत. गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर ओसरून मराठवाड्याला उन्हाचे चटके बसत होते. परंतु, येत्या दोन दिवसांत पुन्हा हवामानात मोठ्या बदलांची शक्यता असून गारठा वाढणार आहे. आज 28 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान जाणून घेऊ.
advertisement
आज शुक्रवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये दिवसभर हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. सकाळ-संध्याकाळ काही प्रमाणात गारठा जाणवेल, तर दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तर किमान पारा 16 अंश सेल्सिअस राहणार आहे.
advertisement
बीडमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बीडमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. तसेच हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी जाणवेल. सकाळी जास्त गारठा जाणवू शकतो तर रात्री बोचरा वारा राहण्याची शक्यता असून दुपारच्या सुमारास सूर्यप्रकाश राहील.
advertisement
advertisement
आज 28 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील आठपैकी कोणत्याही जिल्ह्याला कुठलाही 'सतर्कतेचा अलर्ट' देण्यात आलेला नाही. वातावरणात बदल होत असल्यामुळे थंडी - कमी अधिक जाणवत आहे. तर दुपारच्या वेळेला उन्हाचा चटका देखील लागत आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम लक्षात घेता नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.


