advertisement

Marathwada Rain: ताशी 40 किमी वेगाने वारे वाहणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार

Last Updated:
Marathwada Rain: राज्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात पुढील 24 तासांसाठी 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाचा अंदाज आहे.
1/5
ज्यात गेल्या काही दिवसात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. आज देखील विदर्भासह काही भागांत मान्सून बरसणार आहे. मराठवाड्यात मात्र काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी चांगल्या पावसाची प्रतीक्षाच आहे. अशातच हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना आज 11 जुलै रोजी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा कुठलाही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही. जालना आणि परभणी या जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात दोन्ही जिल्ह्यात 30 ते 40 किमी तासी वेगाने वारे वाहतील तसेच सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

3/5
छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या 6 जिल्ह्यांना कोणताच सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला नाही. तरीही छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका पाऊस आणि ढगांचा गडगडाट राहणार आहे.

4/5
गेल्या 48 तासांपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 5 जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता, तर बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस सांगण्यात आला होता. आज मात्र मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांनाच सतर्कतेचा 'यलो अलर्ट' असणार आहे. तर 6 जिल्ह्यात साधारण पाऊस असेल.

5/5
मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण हे कमी असणार आहे. त्यामुळे खरीप पिके लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ते नियोजन करावे. सध्या वातावरणात बदल जाणवत असल्याने पुढील काही काळ पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement