वृक्षसंवर्धनाचा असाही वसा; पेन्शनच्या पैशातून फुलवलीय फळबाग PHOTOS

Last Updated:
काही निसर्गप्रेमी आपलं आख्खं आयुष्य निसर्गासाठी वाहून घेतात. अशीच काहीशी कहाणी धाराशिवमधील अब्दुल पठाण यांची आहे.
1/6
वृक्षसंवर्धन आणि संगोपन ही आता काळाजी गरज बनलीय. काही निसर्गप्रेमी आपलं आख्खं आयुष्य निसर्गासाठी वाहून घेतात. अशीच काहीशी कहाणी धाराशिवमधील अब्दुल पठाण यांची आहे. निसर्ग प्रेमातून त्यांनी वृक्षसंवर्धनाचा वसा घेतला.

advertisement
2/6
गेल्या 20 वर्षांच्या काळात पेन्शनच्या पैशातून त्यांनी एक एक करून झाडे लावली आणि धाराशिव नगरपालिकेच्या 18 गुंठे जागेवर फळबाग फुलवलीय. विशेष म्हणजे आता या झाडांना फळे आली असून ती लहान मुलांना वाटली जातात.

3/6
धाराशिव शहरातील एकता नगर भागात एक जुनी खदान आहे. याच खदानीचा परीसर 20 वर्षांपूर्वी ओसाड होता. या परिसरात अब्दुल सत्तार पठाण यांनी झाडे लावून आता बगीचा फुलवलाय. पठाण यांनी वाहन चालक म्हणून शासकीय रुग्णालयात सेवा केली.

4/6
1996 साली ते सेवेतून निवृत्त झाले. त्यांना सध्या 15 हजार रुपयांचे निवृत्ती वेतन मिळतेय. त्याच पैशातून त्यांनी जांभूळ, गुलमोहर, चिकू, निलगिरी, निम, आंबा, नारळ, बदाम या अशा फळझाडांची लागवड केली आहे. आता बिस्मिल्ला गार्डन सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतंय.

5/6
जवळपास 18 गुंठे नगरपालिकेच्या क्षेत्रावर पठाण यांनी या झाडांची लागवड केली आहे. शेजारीच दगडाच्या खदानीत वाहून आलेले पाणी आहे. याच पाण्यावर ते फळझाडांची जोपासना करतात. फळझाडांची जोपासना करण्यासाठी त्यांना सद्दाम बेगम पठाण, फिरोज पठाण, फैज पठाण व गल्लीतील लोक मदत करतात. तर फळझाडांना लागलेली फळे ही लहान मुलांना वाटप केली जातात, असंही पठाण यांनी सांगितलं.

6/6
18 गुंठ्यात पठाण यांनी जवळपास 120 झाडे गेल्या वीस वर्षांपासून लावले आहेत. आपण सर्वांनीच आपल्या अवतीभवती घराशेजारी, शक्य असेल तिथे झाडे लावली पाहिजेत. इतकच नाही तर ती जगवली पाहिजेत, असेही बिस्मिल्ला गार्डनचे निर्माते अब्दुल पठाण सांगतात.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement