Jarange Patil Rally : फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ आणि महिंद्रा Thar, जरांगेंचा असा आहे गाड्यांचा ताफा PHOTOS
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज पहिल्या दिवशी हिंगोली येथे रॅली आणि सभा होणार आहे. या सभेसाठी जरांगे पाटील यांचं हिंगोलीमध्ये आगमन झालं आहे, शहरात मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं.
आजपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा सुरू होत आहे. मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली असे या दौऱ्याला नाव देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या वाहानांच्या ताफ्यासह हिंगोलीमध्ये दाखल झाले आहेत, त्यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ आणि महिंद्रा थार अशा वाहनांचा समावेश आहे.
advertisement
advertisement
या रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना दोनशे महिला स्वयंसेविका सुरक्षा देणार आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटीमध्ये ज्या घरात मुक्काम आहे, त्या घरावर ड्रोन घिरट्या घालताना दिसून आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी सातत्यानं करण्यात येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


