Tamhini Ghat : ठिकाण: ताम्हिणी घाट, वेळ: मध्यरात्र! घाटात तरुणासोबत घडलं भयंकर; घटनेनं अख्खा जिल्हा हादरला

Last Updated:

ताम्हिणी घाटातील स्थानिक ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना जमीन दाखवण्यासाठी जंगलाच्या भागातील एका आडमार्गावर गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आला

ताम्हिणी घाटात आढळला मृतदेह
ताम्हिणी घाटात आढळला मृतदेह
(मोहन जाधव, प्रतिनिधी) रायगड : निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांचं आकर्षण ठरणाऱ्या ताम्हिणी घाटातून आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह घाटातील एका आडमार्गावर फेकून देण्यात आला होता.
कशी उघड झाली घटना?
ताम्हिणी घाटातील स्थानिक ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना जमीन दाखवण्यासाठी जंगलाच्या भागातील एका आडमार्गावर गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेहाची पाहणी केली असता, त्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक खुणा आढळल्या आहेत. आरोपींनी तरुणाची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ताम्हिणी घाटाचा आसरा घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही.
advertisement
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केले आहे. घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, मृताची ओळख पटवण्यासाठी पुणे आणि रायगड जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे ताम्हिणी घाट परिसरात पर्यटकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Tamhini Ghat : ठिकाण: ताम्हिणी घाट, वेळ: मध्यरात्र! घाटात तरुणासोबत घडलं भयंकर; घटनेनं अख्खा जिल्हा हादरला
Next Article
advertisement
BMC Election: झटपट निकालाला ब्रेक, बीएमसीची मतमोजणी रखडणार? राज्य निवडणूक आयोगाने वाढवलं उमेदवारांचे टेन्शन
झटपट निकालाला ब्रेक, बीएमसीची मतमोजणी रखडणार? निवडणूक आयोगाने वाढवलं उमेदव
  • मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नियमात बदल

  • महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला वेळ लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • गेल्या काही निवडणुकांमधील मतमोजणीदरम्यान झालेला गोंधळ टाळण्यासाठी नवा नियम

View All
advertisement