गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे मुलांचं आयुष्य बदललं; इतरांनी आदर्श घ्यावा असं केलं काम!

Last Updated:
या गावातल्या शाळेची गंभीर समस्या होती. त्या अडचणीवर गावानं एकत्र येऊन तोडगा काढला आहे.
1/6
शालेय शिक्षण हा सर्वांचा मुलभूत हक्क आहे. मुलांनी शाळेत जावं यासाठी सरकारकडून अनेक योजना आखल्या जातात. या योजनांसाठी मोठा पैसा खर्च होतो. या सर्व प्रयत्नानंतरही ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्यांना मोठे कष्ट करावे लागत आहेत.

advertisement
2/6
 कधी रस्ता धड नाही. कधी वीज-पाणी या गोष्टी नाहीत या त्रासात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतं. <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> जिल्ह्यातल्या निपाणी पोखरी या गावातल्या शाळेचीही अशीच गंभीर समस्या होती. त्या अडचणीवर गावानं एकत्र येऊन तोडगा काढला आहे.

3/6
जिल्हापरिषद शाळेत पहिली ते पाचवी असे पाच वर्ग आहेत. मात्र पूर्वी या पाचही वर्गांना फक्त मोडकळीस आलेली रूम होती. त्यामुळे ऊन, वारा आणि पाऊस सहन करत विद्यार्थ्यांना व्हारांड्यातच शिक्षण घ्यावं लागत असे. त्यावर गावकऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून दोन प्रशस्त खोल्या बांधल्या. आता नवीन शाळेत विद्यार्थी आनंदानं शिक्षण घेत आहेत.

4/6
या गावातील नागरिकांनी सरकारी निधीची वाट न पाहता एकत्र येत तब्बल अकरा गुंठे जमीन लोकवर्गणीतून खरेदी केली. गावातील शाळा चांगली झाली पाहिजे या उद्देशानं प्रत्येकानं आपल्याला जमेल तितकी मदत केली. या वर्गणीतून ही शेतजमीण खरेदी झाली आणि दोन खोल्यांची शाळा सुरू झाली. त्यामधून आणखी एका वर्गाच्या खोलीचं बांधकाम सध्या सुरू आहे.

5/6
गावकऱ्यांच्या पुढाकारामुळेच आज मुलांचं शिक्षण सोपं झालंय अशी माहिती येथील शिक्षक संदीप कुमार गवई यांनी दिली.

6/6
आमच्या गावात 70 वर्षापासून एकाच खोली असलेली शाळा होती. माझ्या अजोबापासून सर्वांचं शिक्षण याच शाळेत झालं. एकाच वर्गात सर्व विद्यार्थी मावत नव्हते. त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणी येत असत. आता या अडचणी कमी होणार आहेत. या शाळेला मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गावकरी अमोल भूतेकर यांनी सांगितलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement