बिबट्याने दबा धरला, एकावर हल्ला पण चलाखीने त्याने घराचं दार लावलं, बिबट्या बरोबर सापडला! खतरनाक फोटो

Last Updated:
बिबट्या घरात असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्परता दाखवत घराभोवती पत्रे लावून बाहेरचा मार्ग बंद केला.
1/5
कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिवरवाडी येथे बिबट्याने ग्रामस्थावर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. गावातील नात बेंद्रे हे आपल्या बांधकाम सुरू असलेल्या घरात साहित्य आणण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेला आढळला.

advertisement
2/5
अचानक समोर आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला. सुदैवाने बेंद्रे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचविण्यात यश मिळवले. दरम्यान, ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच सर्वांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

3/5
बिबट्या घरात असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्परता दाखवत घराभोवती पत्रे लावून बाहेरचा मार्ग बंद केला, ज्यामुळे बिबट्या घरातच अडकून पडला. ही काळजीपूर्वक केलेली प्राथमिक उपाययोजना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास महत्त्वाची ठरली.

4/5
वन विभागाला व सह्याद्री वॉरीयर रेस्क्यू टीमला तातडीने कळविण्यात आले. पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले. सुमारे दोन तास चाललेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात टीमला यश आले. ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील प्रक्रिया वन विभागाकडून सुरू आहे.

5/5
या संपूर्ण घटनेमुळे शिवरवाडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या शांत वातावरणात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी मात्र धाडस दाखवत बिबट्याला घरात अडकवून संभाव्य मोठी दुर्घटना टाळली, याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement